Skip to main content

मिल्क: एक चळवळ

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 03/05/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने माणसांवर इतक्या प्रकारे अन्याय केला असेल की त्यापुढे कोणतीही गोष्ट फिकी पडावी.. माणसाला गोष्टि इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा अधिक वर्गीकृत करता येतात हे मनुष्यप्राण्याचे वैशिष्ट्य समजले जाते. मात्र या गुणामुळे माणसाने माणसाला केवळ वर्गीकृतच केले नाहि तर आपल्या भोवती ही वर्गीकरणाची कुंपणे घालून घेत स्वतःला संकूचिततेच्या सीमेपार ढकलले.. काळा, गोरा, तपकीरी असे रंगांवरून वर्गीकरण करून तो थांबला नाहि तर गोरा श्रेष्ठ, काळा कनिष्ट हे ही त्यानेच ठरविले.. स्त्री-पुरूष हे वर्गीकरण तर निसर्गाने केलेले.. म्हटल्यास तुल्यबळ.. पण त्यातही माणसाने पुरुषाला श्रेष्ठ ठरविले..

ढोबळी मिरचीचे पिठ्ले

लेखक बरखा यांनी सोमवार, 03/05/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नान॑तर सर्वच बायका॑ना आपल्या नवर्‍याला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवुन खायला घालायला फार आवडते. पण सर्वा॑नीच असे करु नये,कारण पति राजा॑नी जर आपल्याला न येणारा पदार्थ बनवायला सा॑गितला आणि तो नाही जमला तर पति राजा॑च्या रगा बद्दल्.......(सा॑गायची गरज नाही) .

गुलमोहोर

लेखक गिरिजा यांनी सोमवार, 03/05/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल मस्तपैकी सुट्टीच्या मूडमध्ये एक मस्त मराठी सिनेमा टाकून द्यावा असं मनात आलं, आणि शोधाशोध सुरु झाली. LAN वरचे जवळजवळ सगळे मराठी सिनेमे / नाटकं पाहून झाल्यामुळे, आज काय? हा प्रश्न होताच! शोधताना अचानक "गुलमोहोर" दिसला. नाव एकंदरीत अनोळखी वाटलं, म्हटलं चला! एक तरी न पाहिलेला सिनेमा मिळाला एकदाचा! लगेच download केला. पार्सल आणलेली झकास चायनीज भेळ आणि पाणी अशी जय्यत तयारी करून मी सिनेमा download होण्याची वाट बघत बसले. तो होईस्तोवर small wonder चा एक एपिसोड पाहिला ;) असो! तर एकदाचा झाला तो download! सुरु केला. सोनाली कुलकर्णी ला पाहून आठवलं की अरे, मला हा सिनेमा माहित आहे!

पहिला पाऊस

लेखक बरखा यांनी सोमवार, 03/05/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस वळ्वाचा पाऊस आधी देखील पडला होता, पण्..कालचा पऊस मात्र, माझ्या साठी पहिलाच पाऊस होता दोघा॑नी पहिल्या॑दा एकत्र पावसात भिजण्याचा आन॑द लुटला होता, तु मात्र माझी वाट पाहुन ओलाचि॑ब झाला होता मी भिजु नये म्हणुन अडोशाला था॑ब म्हणत होता मी मात्र त्या दिवशी हट्टाला पेटले होते तुझ्या सोबत पावसात मला देखिल ओलेचि॑ब व्हायचे होते तुझ्या गालावरुन ओघळ्ण्यार्‍या दव बि॑दुत मला माझे प्रतिबि॑ब पहायचे होते माझ्या बटेतुन गळणारे पावसाचे थे॑ब तुझ्या खा॑द्यावर पाडायचे होते छत्री न्हवती म्हणुन काय झाले एका ओढणी खाली दोघा॑नी बसायचे होते, पण्..तु सा॑गितल्यावर पावसाने ही था॑बायचे ठरवले होते अ॑गावर शहार
काव्यरस

गादीखाली ढेकुणान्ची

लेखक अडगळ यांनी सोमवार, 03/05/2010 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु यांची क्षमा मागुन , मूळ कविता http://www.misalpav.com/node/2111 गादीखाली ढेकुणान्ची , तुरूतुरू हालचाल , कानी कपाळी ढेकूण , झोप पळाली समूळ | चिरडता ढेकूणाला , जळे नाकातील केस, खाज जरा मन्दावते , तोच डसला खवीस| अश्या चपळ ढेकुणा , शोधण्याची धडपड , दडे फटीत जाऊन , झाला नजरेच्या आड| निथळली रांग सारी , शहारला देह सारा , जरा उचलता गादी , कृष्णविश्वाचा पसारा | ओघळले पटापटा , जणु मसुराची डाळ, हलाहलाचे हे थेंब , काळ्या ठिणग्यांचा जाळ | आसमंती फवारला , केरोसिनचा फवारा ओले ढेकुण मरती , क्षण विजयाचा आला | छातिवरी परि एक , जणु ऐकि माझे श्वास

४ चारोळ्या

लेखक sur_nair यांनी रविवार, 02/05/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा डोळ्यात आषाढमेघ येऊन वसलाय मनात मात्र माझ्या वैशाखवणवा पेटलाय ********* तुझी जागा मनामध्ये अपुरीच राहिली फुल खुडलेल्या देठाला का कधी पुन्हा कळी आली? ********* प्रत्येकाच्या कपाळी म्हणे भाग्य लिहिलेलं असतं आठ्या पाडून म्हणूनच ते चुरगळायचं नसतं ********* माणसे तशीच राहतात युग फक्त सरते महाभारतातली द्रौपदी कलियुगातही झुरते सुरेश नायर https://sites.google.com/site/surmalhar/

राजमाची ट्रेनींग कॅम्प - समीट माउंटेनिअर्स (१६,१७,१८ एप्रील, २०१०)

लेखक बज्जु यांनी रविवार, 02/05/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पालकांशिवाय ३ दिवस दुर रहाण्याची बहुतेक मुलांची ही पहिलीच वेळ होती. मुलं गाडीत निट चढ्तील कि नाही?, नीट रहातील ना? जेवतील कि नाही? रात्रीची रड्णार तर नाहीत ना? अशा शेकडो शंका पालकांना. त्यामुळे १६ तारखेला सकाळी ६.३० ला ठाणे स्टेशनला मुलांना सोडायला आलेल्या पालकांच्या चेहर्‍यावरच जास्त काळजी दिसत होती. मुलं एकदम बिनधास्त. मोहिमेचे आयोजक सुजीत साठे यांनी पालकांना आणि मुलांना सर्व सुचना दिल्या आणि ४१ मुलं आणि १० इन्सट्र्क्टर असे आम्ही ५१ जणं इंटरसिटी एक्स. पकड्ण्यासाठी ५ नं. प्लॅट्फार्म कडे रवाना झालो. रिपोर्टींग साठी पहाटे ६.३० ला ठाणे स्टेशन १ नं.

प्रेम - एक अनुभव

लेखक स्मृती यांनी रविवार, 02/05/2010 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुनी गोष्ट नाही ही, गेल्या १०-१५ वर्षांतलीच आहे. एक छोटंसं, टुमदार नगर होतं. तिथले लोक खाऊन पिऊन सुखी, आनंदी, उत्सवप्रिय होते. हेवेदावे, मतभेद नव्हतेच असं नाही; पण अगदी चवीपुरते होते आणि तेवढेच चघळले जायचे. मुळात सगळे कुठल्या ना कुठल्या सोहळ्यात इतके गुंतलेले असायचे की आपोआपच या नकारात्मक गोष्टी मागे पडायच्या. जगदीश पांचाळ, लता राऊत आणि सुषमा कुलकर्णी हे तिघे त्या नगरातल्या तरूणाईचे प्रतिनिधी. लताच्या घरचं वातावरण कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि तसं पारंपारिक. सहा भावंडांत लताचा दुसरा नंबर. बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला. काळी-सावळी पण रेखीव. सदैव हसरा तरतरीत चेहरा.

आपलाआपला इतिहास...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 01/05/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्याला आज ५० वर्षे झाली. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला... व्यक्तीच्या आयुष्यात, ५० वर्षांचा काळ लोटला, की त्याच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घ्यायची योग्य वेळ आली, असे समजतात. पन्नाशी उलटली, की आपण कुठे होतो, कुठे आलो, आणि कुठे पोहोचायचे याचे चिंतन आपोआपच सुरू होते. मागे वळून पाहिले जाते, आणि आपण स्वत:सोबत जोडल्या गेलेल्या भूतकाळाचे पदर उलगडू लागतो... ह्या आठवणीची साठवण, हा आपला `इतिहास' असतो... ... प्रत्येकाच्याच वाटणीला त्याचात्याचा इतिहास आलेला असतो...