Skip to main content

पुन्हा एकदा खाउच!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा कविता... आजही ती वाचयला नाही तिच्याआयला! आज सार तसच घडल, मला आजही तीची नजर चुकवुन पाणी सोडायला मिळाल आज तिच्या वागण्यात संकोच नव्हता, बेशरमेचा फायदा उचलायचा माझा निश्चय होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, बर होत,ती आज पण घेउन आली होती. पावसाने फारच मेहरबानी केली, अंग भिजल्यावर ती मला 'चल घेउया' म्हणाली. तेव्हापासुन नशा काही अजुन उतरली नाही, आणि माझी हरवलेली वस्त्रे अजुन मिळाली नाहीत. - फाजील मन.
काव्यरस

रावणाची सीता

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 20/06/2010 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते. तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही.

I bet एवढा मोठा आंबा आपण पाहीला नसेल!! काही खुलासे.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
येथे जाउन बघा! तो आंबा २० वर्षाच्या मुलाने हातात पकडला आहे,मुलगा सडपातळ असला तरी पंजा ब-यापैकी मोठा आहे.तेव्हा आंब्याच्या आकारावर शंका घेउ नका. आपणास माझ्या आंब्याच्या तोडीचे असे काहीच इथे दाखवता येणार नाही का? आणि हो हा आंबा पुर्ण झाडावर एकच आला होता. आंब्याची गि-हायक गेली मसनात!! काय विकायला नाही ठेवला!!

नैसर्गिक काष्टशिल्पं (माझ्या नजरेतुन)

लेखक jaypal यांनी रविवार, 20/06/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे.

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
काव्यरस

असहमत! असहमत!! असहमत!!!

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 20/06/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
राग म्हणजे काय, लय म्हणजे काय, गायकी म्हणजे काय, तान म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर म्हणजे काय, ते अण्णांकडूनच शिकावं
आज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही.

मै सोला बरसका

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 20/06/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॅच काढुन मी हॉल मधे प्रवेश केला. स्वयंपाक घरातुन आवाज येत होता. कुटुंबाचे मैत्रीणीबरोबर फोन वर बोलणे चालु होते. वाक्य कानावर आलो. तिथेच थबकलो. .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> "अग ह्यांच्याबरोबर कुठे जायचे म्हणजे संकटच असते" ....... "अग, काल एका लग्नाला गेले होते. हे ऑफिसमधुन थेट आले. जरा उशिराच आले. आल्या आल्या ह्यांच्या फॅन क्लब ने घेराव घातला. साधारण १५ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकाने प्रश्न विचारला. ह्यांनी उत्तर दिले. त्यातले ६ जण डोळ्यात पाणी येइपर्यंत हसले.

सध्याचे वाचन - सात सक्कं त्रेचाळीस

लेखक बट्ट्याबोळ यांनी रविवार, 20/06/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच किरण नगरकर यांचे "सात सक्कं त्रेचाळीस" हे पुस्तक वाचले ... मुख्प्रुष्ठाच्या तळाशी लिहिलय - "क्या फर्क पडता है ??" आणि त्या खाली "पडता है .. ". कादंबरी ची हीच थीम आहे. जरी कोणी म्हणलं, की "सात सक्कं त्रेचाळीस", काय फरक पडतो ? फरक पडतो ... !! "कुशांक" ला तरी पडतो ... कुशांक चा फारसा थरारक नसणारा, इन फॅक्ट "झंड" असणारा हा जीवनपट आहे. आणि त्यात जगण एवढेच प्राप्त असते. आशय बिशय घंटा शोधणार त्यात. माणसाचं "प्राणी" पण यात उघडं पडत. काय लिहिल आहे यात ते तुम्हीच वाचा. ही कादंबरी वाचावी ही त्यातल्या भाषा प्रयोगात रस घेऊन. डोक गरगरून टाकणारे हे लिखाण आहे.

आजची स्त्री-२

लेखक पुष्करिणी यांनी रविवार, 20/06/2010 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हदेशात गेल्या दोन दशकांपासून अहिंसेच्या मार्गानं चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी चेहरा. गेल्या वीस वर्षातला अधिकांश काळ तुरूंगात / नजरकैदेत काढूनही जनतेच्या मनातल त्यांच अढ्ळ स्थान. त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार. 1 दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या.

ब्लॉगवाले सावधान!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
'फुगल'ने फतवा काढला आहे की,ज्या ब्लॉगवरच्या पोस्टना दहा दीवसापेक्षा जास्त वेळापासुन एकही प्रतिसाद मिळाला नाहीये व कधीच ज्या वाचल्या जात नाहीत/गेल्या नाहीत,त्या सर्व पोस्ट delete केल्या जातील.तेव्हा.............. ज्या मिपाकरांनी व त्यांच्या संबंधीत लोकांनी उगाच मोफत खरडायला मिळत म्हणुन जे पोस्ट,लेख(अर्थात फालतु हा शब्द कमी पडतो आहे) लिहले आहेत्,ते त्वरीत दुसरा एखादा बळी बघुन तिथे टाकावेत.उशीरा जाग आलेल्या,स्व:ताला अनुभवी लेखक/कवी समजणा-यांनी(त्यांचे गैरसमज वाढवणारे ही लेखकच/कवीच असतात,त्यांचा उद्देश हाच की आपला लेख कोणी माणुसकी म्हणुन वाचेल).......आपले ते पोस्ट स्वःताच कुठेतरी हलवावेत. काहींनी