Skip to main content

गीत: कधी कधी खोटं बोलाया लागते

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 22/06/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी खोटं बोलाया लागते
कधी काम करतांना, कधी काम सांगतांना तुमची आमची कसोटी खरोखर लागते लोकहो तुम्हां खरखरं सांगतो, तेव्हां कधी कधी खोटं बोलाया लागते ||धृ|| लहाणपणीचे साधे उदाहरण तुम्ही घ्याना शिक्षक सांगती अमूक तमूक गृहपाठ करूनी आणा न केला अभ्यास तर तुम्ही काय देता उत्तर? ठावूक असे गुरूजनांना त्याचे कारण तरीही शिक्षा मिळे तुम्हांला ओल्या छडीची खोटे बोलणे तेव्हा आपसूक येई तुमच्या ओठी असलेच खोटे खोटे बोलणे तेव्हापासून सुरू होते म्हणून तुम्हा खरखरं सांगतो तेव्हा कधी कधी खोटं बोलाया लागते ||१|| मोठे

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

आमंत्रण ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/06/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
बेभान उधाणला वारा थेंब टिपूर पावसाचे ... अंगणी ठरेना पाऊल परसात धुंद मोर नाचे ... वसंत कोवळा पानोपानी कानी सुर ते मल्हाराचे ... अतृप्त चातक पाऊसवेडा तया आकर्षण जलदांचे ... गळू लागल्या उन्हपाकळ्या भेदूनी पडदे ते ग्रिष्माचे ... रसरसली अन् वसुंधराही होता आगमन हे वरुणाचे ... फुलूनी आल्या मुग्ध कळ्या लेवूनी वसने शरदाची ... ओघळला अलवार प्राजक्त गुणगुणतो गाणे आनंदाचे ... सुखे ओलावली वसुधा नभ ओघळले पावसाचे ... क्षितीजापार उभा रवी घेवुनी आमंत्रण उजळायाचे... विशाल

रोहीडा: बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 22/06/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
२० जूनला सकाळी कुठेतरी भटकायला जायचे ठरले आणी लगेच ठिकाणही ठरले ते म्हणजे भोरजवळील रोहिडा किल्ला बरेच दिवस तो करण्याचे मनात होते पण काही केल्या जमत नव्ह्ते. आज योग जुळून आला. आम्ही चौघे मित्र निघालो ते मित्राच्या चारचाकीने. सव्वा तासातच भोरपासून ८ किमी असलेली बाजारवाडी गाठली. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे अतिशय सुंदर असे गाव. गावापासून लगेच चढाईला सुरुवात होते. पावसामुळे हवेत मस्त गारवा पसरला होता. शेतं हिरवीगार झाली होती. काळे ढग मधूनच बाजूला सरकून निळाइचे दर्शन घडवत होते.

पुस्तक परिचय : "आत्मा ते जनुक"

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 22/06/2010 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच. मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो. आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

गीत: अरे अरे रिक्षावाल्या

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 22/06/2010 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अरे रिक्षावाल्या
अरे अरे रिक्षावाल्या तू चाललास कुणीकडे जायचे आहे मला तिकडे, तू नेतोस भलतीकडे ||धृ|| संध्याकाळची वेळ झाली, नाही मिळेना वाहन थांबून थांबून कंटाळले, उरले नाही त्राण शेवटचा उपाय म्हणूनी बोलावली तुझी रिक्षा का उगाच लांबून नेतो, मला माहीत आहे रस्ता असं कसं करतोस, भलत्याच भागात आणले मला इकडे जायचे आहे मला तिकडे तू नेतोस भलतीकडे ||१|| लांब माझे घर आहे, रिक्षा ने की घराजवळ मिटरने जे काही होईल तेच पैसे मी देईल नकोस मागू जादा भाडं, नेहमीच करते मी रिक्षा काहीबाही बोललास
काव्यरस

शाब्द ज्ञान

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 22/06/2010 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाब्द ज्ञान (कल्पनारम्य कथा) - - - असिद्धवदत्रा! भाति सर्वं शब्देन विना । येथे सर्व काही असिद्ध असल्यासारखे भासतंय हो! शब्दांविना बुद्धी काही समजूच शकत नाही, असे तर नाही ना? नासदासीन्न सदासीत् । "असणे" आणि "नसणे" हेच शब्द नसले तर ज्ञान कुठले? तसे नव्हे. काहीतरी आहे. शब्द नसले तरी संवेदनांमधून काही कळते. नावे नाहीत म्हणजे ज्ञानच नाही, हा भ्रम आहे. "नाव" हे कसले नाव? नाव म्हणजे संकेत-शब्द. "शब्द" हे कसले नाव? शब्दच माहीत नसता, शब्दांतच शब्दांची व्याख्या शक्य नाही. मग व्याख्यांबद्दल कुतूहल तरी शब्दांविना कसे शक्य आहे? कुतूहल म्हणजे ज्ञानासाठी तहान. तहान ही संवेदना आहे.

ब्राझील फुटबॉल जत्रा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 22/06/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद .. काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...

घुबडाचे पेलेट्स

लेखक शुचि यांनी सोमवार, 21/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. फ्रीवेवर नेहेमीप्रमणे लहान स्कंक, रकून सारखे प्राणी मधे मधे दिसत होते चिरडले गेलेले. यावेळेला मुलगी बरोबर असल्याने माझ्यातल्या "आई"ने ज्ञान द्यायची संधी दवडली नाही. मी मुलीकरता एक पुस्तक आणलय जे की तिने अजून वाचायचय पण मी वाचून संपवलय. त्या पुस्तकात- एका कुटुंबानी एक सोनेरी गरुडाचं पिल्लू पाळलेलं होतं आणि त्यांच्यापुढे समस्या ही होती की या पिल्लाला खायला काय घालायचं? कारण शिजवलेली कोंबडी, सॉसेज, मटण वगैरे खाऊन आठवड्या दोन आठवड्यात हे शिकारी पक्षी मरतात. या पक्षांकरता आख्खा उंदीर, रकून, स्कंक, खार, कोंबडी वगैरे असं खाद्य लागतं.