Skip to main content

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 27/10/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्‍या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्री. पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो.. [मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse… या दुव्यावर वाचता येईल.

पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा !

लेखक मितान यांनी बुधवार, 27/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज टपाल बघत होते. दोन बँकेची पत्रं, एक वीज बिल, ५ जाहिरातींची पत्रं ! सगळी छापील ! माझे नाव पत्ता पण ! किती दिवस झाले बरं हस्ताक्षरातला स्वतःचा पत्ता वाचून ? पत्र या माध्यमाने भारलेले दिवस आठवले. जेव्हा मी एका सामाजिक संघटनेचे काम करत असे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत शिबिरं असायची. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर पत्रांचे पूर. साधारण १२ वर्षांपूर्वीच्या त्या पत्रांमधली वाक्य आजही काळवेळ न पाहाता डोक्यात घुमतात. " मायाताई, तुझी खूप आठवण येते गं, शाळा छान चालू आहे, तुझ्या आईबाबाना नमस्कार " " मायडे, भोसला मिलिटरी स्कूल ने बोलावलंय, जाऊया नं? " " वादळात भरकटणार्‍यांना कोणतीच दिशा नसते.

करंजीचे पुरण

लेखक जागु यांनी बुधवार, 27/10/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्‍याच्या वाट्या मुगाचे पिठ १ वाटी रवा अर्धी वाटी कणीक अर्धी वाटी २ चमचे खसखस चारोळी बेदाणे आवडते ड्रायफ्रुट्स वेलची पावडर तुप पिठी साखर क्रमवार पाककृती: तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्‍याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा. आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्‍यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो.

करंजीचे पुरण

लेखक जागु यांनी बुधवार, 27/10/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्‍याच्या वाट्या मुगाचे पिठ १ वाटी रवा अर्धी वाटी कणीक अर्धी वाटी २ चमचे खसखस चारोळी बेदाणे आवडते ड्रायफ्रुट्स वेलची पावडर तुप पिठी साखर क्रमवार पाककृती: तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्‍याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा. आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्‍यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो.

बांड्या

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 27/10/2010 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी झुपके-दार, कुणाची लवलवती देखणी कुणी केसांचे दोर, मिरविती झुलती केरसुणी गर्वाने शेपूट उचलती रांपावर मखडुनी सौष्ठवाचे करीती प्रदर्शन प्रेक्षकास पाहुनी “शेवटची एन्ट्री येऊद्या” घोषणा ती ऐकुनी घट्ट भुवरी खिळून राही श्वान पाय रुतवुनी साखळी खेचित आणी मालक तरीही ओढूनी हाय, दिले की चुचकारोनी रांपावर सोडुनी जिथे सोडले तिथेच राही, मान जरा झुकवूनी परी प्रयत्ने मध्यावरती आणिले परिक्षकांनी पाहतसे बसलेल्या लोकां, धीर जरासा करुनी दाद येतसे टाळीभरली, जमलेल्यांच्या कडूनी क्षणात कळले आपण सुंदर, कडकडाट ऐकोनी जरी टाकले अपुले शेपूट छाटून मालकानी उगा चिडविती बाकी कुत्री, बांड्या संबोधुनी पळत नाही मी त्य

गुरुचरित्रामधील ४ युगांचे स्वरूपवर्णन

लेखक शुचि यांनी बुधवार, 27/10/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुचरित्राच्या दुसर्‍या अध्यायामध्ये ४ युगांचे अतिशय काव्यमय आणि बोलके वर्णन येते. जेव्हा विष्णू ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची आज्ञा करतात तेव्हा स्थावरजंगम्,स्वेदज, जारज, अंडज आदिंची उत्पत्ती केल्यानंतर ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करतात, आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात. कृत (सत्य), त्रेता, द्वापार आणि कली या युगांना एकेक करून बोलावणं धाडण्यात येतं. ही कथा गुरुचरित्रात अतिशय रसाळतेने वर्णन केलेली आहे आणि मूळातूनच वाचण्यासारखी आहे. तिचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे. सर्वात प्रथम पाळी कृतयुगाची.

टॉमेटोच्या वड्या

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 27/10/2010 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१) १ खवलेला नारळ. २)अर्धा किलो टॉमेटो अथवा २ वाट्या टॉमेटोचा रस. ३)३ वाट्या साखर. ४)५-६ वेलदोड्याची पूड. कॄती:- प्रथम टॉमेटो वाफवून घ्या.मिक्सर मधुन रस काढा. खवलेला नारळ, साखर, टॉमेटोचा रस एकत्र करून शिजवा. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला. नरम गोळी होइपर्यन्त शिजवा. नन्तर तूप लावलेल्या थाळीत थापा.थन्ड झाल्यावर वड्या कापा. फोटू टाकता येत नाहीत तरी कॄपया त्याची रेसिपी मला द्यावी हि विनैती.