Skip to main content

उजव्या सोंडेचा गणपती

लेखक शुचि यांनी सोमवार, 08/11/2010 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते.

एक सुरेल आठवण

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 07/11/2010 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नॉस्टॅल्जिक आठवणी बहुतांशी शास्त्रीय वाद्य संगीताच्या आहेत. कधी काळच्या कित्येक मैफली ध्वनीचित्राफितीसारख्या मनात कोरलेल्या आहेत. २९ डिसेंबर २००२ ची उ. विलायत खान साहेबांची सवाई मधली (शेवटची) मैफल त्या पैकी एक. उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत. सतार या तंतू वाद्याच्या रचने मध्ये आणि ती वाजवण्याच्या तंत्रामध्ये महत्वाचे बदल करून तिला 'गायकी अंग' देण्याचं आणि 'विलायातखानी बाज' प्रस्थापित करण्याचं 'अवतार कार्य' च त्यांनी केलं. निव्वळ सतारच नव्हे, तर एकूणच शास्त्रीय वाद्य संगीताच्या प्रचलित मर्यादा ओलांडणारी ती क्रांतीच होती.

नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास.

लेखक हैयो हैयैयो यांनी रविवार, 07/11/2010 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास. वाचकमित्रहो, विशेषतः मिसळपावप्रेमींनो, नमस्कार! ह्यापूर्वी मिसळपावावर नाडिग्रंथांविषयी बरेच लेखन होऊन गेलेले आहे, बर्‍याच चर्चा झडून गेल्या आहेत. त्यामध्ये एक तमिळभाषक आणि पुरातन तमिळभाषेचा अभ्यासक ह्या नात्याने आत्तापर्यंत कोणीही न चर्चिलेले विषयांस मी हाती घेतले हे आपणांस ठावूक आहेच.

नववर्षदिन ?

लेखक पारा यांनी रविवार, 07/11/2010 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू समाज, नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरं करतो, तर मग हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षाभिनंदन कसले ? तर हे व्यावसायिक नववर्ष, जसा इंग्रजी तालिकेनुसार १ एप्रिल असतं तसंच हे आपल्यासाठी. आता आपण १ एप्रिल ला नववर्षदिन मानतो का ? नाही तर मग पाडवा का ? ह्याचा मूळ संदर्भ सौर आणि चांद्र कालगणनेत सापडतो असे ऐकले आहे. पण ह्याहून जास्त मला माहिती नाही. कोणी जाणकार ह्याहून जास्त सखोल माहिती देऊ शकेल का ?

पिंपळ...

लेखक अवलिया यांनी रविवार, 07/11/2010 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपळ. कधी एखाद्या नर्तकीप्रमाणे सळसळ करत डोलणारा, कधी शंकराच्या तांडव नृत्याप्रमाणे आसमंत घुमवुन टाकणारा आवाज करत आपल्या बाहुंनी सर्व जगाला कवेत घेणारा तर कधी स्वतःशीच मस्तीत शीळ घालत बसल्या जागी हसत हसत बोलणारा तर कधी एखाद्या सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्याप्रमाणे निश्चल होऊन स्वतःची सर्व जाणीव हरपुन बसलेला. पिंपळाच्या विविध रुपांनी माझे मन नेहमीच हरखुन जाते. पिंपळ खरे तर कुठेही दिसतो. जिथे जागा मिळेल तिथे उगवणार्‍या गवताप्रमाणेच पिंपळ हा वृक्ष कसा काय उगवतो हे मला नेहमीच कोडे पडते.