Skip to main content

अनुप्रास

लेखक शरद यांनी सोमवार, 27/12/2010 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतांना ज्या कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे १] देवी दयावती दवडसि दासाची दु:खदुर्दशा दूर पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर ! मोरोपंत २] कुरुकटकासि पहाता, तो उत्तर बाळ गडबडला, स्वपरबळाबळ नेणुनि, बालिश बहु बायकांत बडबडला ! मोरोपंत लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर ( विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ) ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच.

पूर्णब्रह्म!

लेखक असुर यांनी सोमवार, 27/12/2010 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याचा विषय निघाला आणि पुणेकरांनी तिथे आपले मत व्यक्त केले नाही असं आजपर्यंत झालं नाहीये. आणि मीही अस्सल पुणेकर आहे, त्यामुळे जाईन तिथे, आणि जमेल तिथे मतप्रदर्शन करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि आद्यकर्तव्य आहे. असो, पुणेकरांचे हक्क आणि त्यांचे कर्तव्यपालन हा एक चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो, तूर्तास आपण खाण्याकडे वळूयात. मुळात आपण भारतीय लोक चवीच्या बाबतीत अतिशय लकी आणि सुखी आहोत हा शोध मला भारतात होतो तेव्हा लागला नव्हता हे करंटेपण मान्य करूनही मी हे सांगू इच्छितो की आपली खाद्यसंस्कृती ही आंग्लभूमीला खरोखर भयभीत करून सोडणारी आहे. एखादा इंग्रज खाण्याचे असे किती प्रकार सांगू शकेल?

चालो जमवा: अहमदाबाद मिपाकट्टा.

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 27/12/2010 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय एम चा कॅम्पस कस्त भटकून झाला. संध्याकाळचे साडेआठ वाजले होते. जागतीक अर्थव्यवस्था . संघ आणि भाजप , गांधीवाद , गुजराती लोक आणि त्यांच्या सवयी , अणु युद्ध होईल का , आपण किती इंचाने माघार घेत आहोत , खलिस्तान चळवळ आणि बिहारी , युरो डॉलर आणि भारतीय रुपया ,मिपावरील डामरट प्रतिसाद , सिग्नेचर किंग टार्‍या इत्यादी विषयंवर तज्ञामध्ये गहन चर्चा सत्र झाल्यानन्तर क्लिंग्टन आणि विजुभाऊ ना कडकडून भूक लागली होती. अहमदाबादच्या रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच खाद्यपदार्थांची रेलचेल होती.

ती अंधार पोकळी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी रविवार, 26/12/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
त्या अंधार पोकळीचे आणि माझे नाते तसे जुनेच. शाळेत असल्यापासुनच मला स्टेजवरील त्या अंधार पोकळीचे खुप आकर्षण होते. लहानपणापासुनच मी फार एकलकोंडी. तासनतास एकटं रहाण्यात मला काहीच वाटायचं नाही, उलटं एकटं रहाणं आवडायचं. मित्र-मैत्रिणी देखिल अगदी मोजक्याच. मग माझी डायरी हिच माझी सखी होती. अगदी लिहीता – वाचता यायला लागलं त्या वयापासुन मी कविता, लेख व मनातील गुपितं माझ्या डायरीत लिहायला लागले. मनातलं कुठेतरी व्यक्त करायचं ठिकाण म्हणजे माझी डायरी, माझ्या कविता. एरवी लोकांसमोर फारसं बोलता पण न येणारी मी शाळेतील नाटकांमधुन मात्र बिन्धास्त व उत्तम कामं करायची.

`कांदे'पालट!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 26/12/2010 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
कांद्यानं शंभरी गाठल्याचे संभाव्य परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर दिसून आलेच. पण इतर न दिसलेले आणि फारसे प्रकाशात न आलेले परिणामही देण्याचा हा प्रयत्न. ... मुलगी "पाहण्याच्या' कार्यक्रमात शिष्टाचारसंमत आणि समाजमान्यताप्राप्त "कांदे-पोहे' जाऊन त्याजागी "बटाटा-पोहे' आले. त्यामुळे "अहो, शकूला कांदे-पोहे आणायला सांगा,' असं म्हणून "आमची शकू फर्मास कांदे-पोहे करते हो!' अशी भलामण करण्याची संधी वधुपित्यांच्या हातून निघून गेलेय. त्याऐवजी शकूला बटाटे-पोहे आणण्याची हाक दिली जातेय. "मुलगी नाकानं कांदे सोलणारी आहे हो!' असं म्हणण्याचीही वरमाईंची पंचाईत झालीय! ... - परवाचीच गोष्ट.

जालावरील चौसष्ट कला--

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/12/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर उपयोगी पडणाऱ्या चौसष्ट कला- भारतीय संस्कृतीमधे चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. दुवा- http://balsanskar.com/marathi/lekh/45.html ह्यामधल्या अनेक आजच्या युगात कामी येत असल्या, तरी खास जालसंस्कृतीमधे उपयोगी अशा कोणत्या कला आहेत असा विचार मनात आला. मिपावर अनेक सृजनशील सभासद आहेत. ६४च काय, शंभर देखील कलांची यादी नक्कीच होउ शकेल. डिसक्लेमर-१- जालावर म्हणजे मिपावर असा आत्मकेंद्री अर्थ घेउ नये. डिसक्लेमर-२ शेवटच्या वाक्याचा गर्भितार्थ शंभर प्रतिक्रीया असा नाही. यादीची सुरवात मी करतो.

भरलं वांगं (बेक्ड)

लेखक गणपा यांनी रविवार, 26/12/2010 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
वांग्याच नाव काढल्यावर बरेच जण तोंड वाकड करतात. माझ तस एक शेपूची भाजी सोडली तर बाकी कुणाशी वाकड नाहीये. त्यामुळे जे काही ताटात येत त्याला उदार मनाने उदरात जगा देतो. सध्या मस्त वांग्याचा सिझन आहे. तशी इकडे जवळ जवळ वर्षभर वांगी मिळतात. पण ही असली मोठ्ठी वांगी इथे ठरावीक सिझन मध्येच येतात. नेहमी सारख वांग्याच भरत किंवा काप करुन तळण्या पेक्षा या वेळी काही तरी नवा प्रयोग करावासा वाटला. सद्ध्या बेकिंगच खुळ डोक्यात बसलय. आजची पाककृती ही त्याचीच परिणीती आहे. :) तर मग आपला बहुमुल्य वेळ न दवडता लगेच पाककृती कडे वळतो.

शोध - एका हरवलेल्या प्रश्नाचा

लेखक रन्गराव यांनी रविवार, 26/12/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नितीननं तारवटलेल्या डोळ्यानी घड्याळाकडं बघितल. सकाळचे सहा वाजून गेले होते. प्रोग्रॅमचे रिझल्ट परत एकदा तपासले, खूष झाला, दोन नाइटऑउटस सार्थकी लागल्या होत्या. असाइनमेंट सबमिट केली. मनातल्या मनात विचार केला. थोडी झोप घेवूयात आता, बाकीच्या विषयांचा सबमिशनही येइल एक दोन दिवसात. असा विचार करून लॅबमधून बाहेर पडू लागला तोच कॅलेंडरवर नजर गेली. आज तारीख २६ जानेवारी २००१. लगेच लक्षात आला अजून दिड एक तासानी झेंडावदन असेल. प्लॅन बदलला. हॉस्टेलवर गेला. छान आंघोळ केली. थोडा वेळ टीव्ही रूममध्ये काढला.