Skip to main content

वर्गलढा एक कविकल्पना

लेखक स्वामीयोगेश यांनी बुधवार, 19/01/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
१) साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणी वर्ग लढ्यावर आधारित आहे. त्या अनुसार समाजात २ वर्ग आहेत, १ आहे रे आणि दुसरे नाही रे. आहे रे नाही रेंचे शोषण करून श्रीमंत होत असतो आणि या दोन वर्गांचा लढा सामाजिक आणि राजकीय क्रांती च्या रूपाने उभा करून समाजात समानता आणणे हे यांचे उद्देश्य आहे / होते. २) पण प्रत्यक्षात पूर्वेत आणि पश्चिमेत दोन्ही कडील देशात जर अभिजात साहित्य वाचले तर असे दिसून येते की २ राजांमधेय्च लढाया झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील काव्य नाट्य, साहित्य कृतींमध्येच फक्त वर्ग लढा इ वाचावयास मिळते आहे. आजही टाटा बिर्लाशी लढतो आहे, अंबानी त्यांनाच समकक्ष अश्या स्पर्धकांशी लढतो आहे.

आभास हा.....

लेखक रेवती यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना! बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्‍या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही.

आपले शब्द छान मित्र झाले आहेत ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुमचे नाव ऐकून आहे तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत कोण हो तुम्ही.? कोण हो मी ..? हा आपण प्रश्न नाही विचारायचा कधीसुद्धा ..!! कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या मुठभर उधळलेल्या .... आपापल्या परीनं चमकत राहतील चांगले मित्र होऊन मस्ती करतील करुद्या...! खेळूद्या ...!! आपण त्यांची मैत्री बघू कधीतरी मनात येते माझ्या: शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे किती छान आहेत ....! मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
काव्यरस

नाकाची उचकी

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 19/01/2011 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
आई आज काय आहे ते सांग तरी, कोणासाठी बनवली ही बासुंदी पुरी? तुझे प्रश्न ऐकून, मी त्रासलेय पुरी बाहेर जाउन खेळ, बसू नकोस घरी आणतील का मोठे, खाउ छान छान? का सांगतील खोटे, बंद होते दुकान! परवा पाहुण्यांनी उचलून घेतले थेट गाल पिळून हा्ती दिले छोटे चॉकलेट अवलक्षणी कार्टा लाज माझी काढतो नसते प्रश्न विचारून भंडावून सोडतो आजच्या काकांचे नाक जरा वाकडे सारे सोडून कार्टे हसेल बघून तिकडे आज गप्प बस, पचकू नको, नको तिथे नाकाविषयी बोलू नको काही उलटेतिलथे काकांना बघता आईलाच आले टेन्शन मनात करी वाकड्या नाकाचे निरीक्षण नाक जणू एकीकडे चिमट्याने खेचले की ठोशाच्या धपाट्याने ठसकन ठेचले!

Accepted (2006)

लेखक आत्मशून्य यांनी बुधवार, 19/01/2011 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
कथेचा नायक बार्टलबी (Bartleby Gaines) हा एक टीनेज मूलगा तूमच्या माझ्या सारखा एक सामान्य व्यक्तीमत्वाचा, थोडासा धडपड्या . जो त्याच्या मीत्रांसोबत हाय स्कूल मधून (मराठीत आफ्टर ट्वेल्थ) कोलेजला जाण्याचे मनसूबे रचत आहे. व्यक्तीमत्व सामान्यच परंतू पोरगा एकदम करामती आहे, म्हणूनच कूठे फेक आयडी (वोटर आयडी , लायसंन्स इ...) बनव अथवा आवडत्या मैत्रीणीच्या पार्टीसाठी (भलेही त्याला आमंत्रण नसेल) तीच्या घराच्या हीरवळीला पाणी घाल असे समाज ऊपयोगी उद्योग करणारा (कभी हा कभी ना चा शाहरूख म्हणाना) गूणी बाळ अभ्यासात थोsssssडा कच्चा पण व्यवहारात तसा हूश्शार.

एक सोपे कोडे (हॉटेल आणि मंदी)

लेखक निकित यांनी बुधवार, 19/01/2011 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या मंदीमध्ये एका गावाची पार वाट लागली आहे. गावातील प्रत्येक व्यावसायिक उधारीच्या बोज्याखाली आहे. सुदैवाने त्या गावात शहरातून एक धनाढ्य सावकार येतो. सावकाराला गाव आवडते. तो तिथे एक दिवस राहण्याचा निर्णय घेतो आणि गावातील एका हॉटेलात जातो. हॉटेलात खोली उपलब्ध असते. खोलीच्या भाड्याचे १,००० रु. मालकाला देऊन तो खोली पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर जातो. हॉटेल मालकाची त्याच्या किराणा दुकानदाराकडे १,००० रु. ची उधारी असते. त्यामुळे तो धावतच त्याच्याकडे जावून ती उधारी चुकती करतो. किराणा दुकानदार धावत त्याच्या होलसेल विक्रेत्याकडे जातो आणि त्याची १,००० रु.

कलियुग

लेखक मुक्त यांनी मंगळवार, 18/01/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
"कधी आल्या आत्याबाई ममईवरुन?" "रातीच आले" "बर्‍या खुशाल का?" "हां... तुम्ही खुशाल तं आम्हीबी खुशाल" "सकाळपसुन बसल्यात इथं वट्ट्यावर... उन्हाला.." "हां..मोकार कळांगान सुटलय रातपसुन. पार रक्त गोठलय" "हां ना. पावसाळ्यात ऊन आन हिवाळ्यात पाऊस. कलियुग.. दुसरं काय?" "ह्म्म्म... " "ममैला कोनकोने मंग?" "डाक्तर नवरा बायकु. आन एक पोरगी" " पोरगी येकुलती येके का?" "नाही. एक पोरगा हायेना. पुण्यालाय कालेजात" "पोरगी लहाने का?" "नाही. मोठीये. लग्न झाल् त तीच" "मंग?" "आली परत माहेरी" "कम्हुन" "तीचा नवरा गेला. पळुन...." "अरे पांडुरंगा....दुसरी केली का?" "नाही.

मोबाईल फोन

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 18/01/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
त्या गावांत चौघेजण चौघांकडेही मोबाईल फोन वेगवेगळे हॅण्डसेट, अन् वेगवेगळे रिंगटोन कायम कामात असतात ते त्यात फारसा 'चेंज' नाही एकाच गावात असूनसुध्दा भेटण्यासाठी 'रेंज' नाही बोलतात, भेटतात फोनवरच एसेमेसमधून पडते गाठ "हाय.. हॅलो .. कसं काय" (हे फोनलादेखील झालंय पाठ) एके दिवशी एकजण वैतागूनच गेला फार गप्पा मारु, भेटू तरी काहीतरी करु यार त्याने मग सगळ्यांना एके दिवशी एसेमेस केले दिवस ठरवला, रानात गेले फोनसुध्दा फेकून दिले गप्पा झाल्या, खूप हिंडले, हसले, खेळले, खूप रडले, वेळाचेही नव्हते भान मजा केली त्यांनी छान. . . . . . . . . . . . . . . . . .