Skip to main content

ऋतू बदलतात...

लेखक मितान यांनी सोमवार, 31/01/2011 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्‍या बर्फाच्या चुर्‍यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्‍यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन...

बूटासिंगची गोष्ट !

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 31/01/2011 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला ज्ञात असणारा इतिहास हा प्रामुख्याने काही महत्त्वाची ऐतिहासिक पात्रे आणि घटना यासंबंधीचा असतो. याव्यतिरीक्तही भूतकाळात बरेच काही घडत असते, ज्याला फारसे ’मूल्य’ नसल्याने ते कोणी लक्षात ठेवत नाही. मात्र या घटना आपल्यासोबत त्या काळाच्या काही विवक्षीत खुणा घेऊन उभ्या असतात- ज्या पाहिल्यावर आपल्याला स्वत:चाच जुना फोटो पाहिल्यावर होतो, तशा जातीचा आनंद होतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ काळ: भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि फाळणी झाली, तेव्हाचा.

ऑरेंज केक

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 31/01/2011 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बिनामैद्याच्या ऑरेंज केकची कृती असहकार यांच्या मुलीसाठी दिली आणि लगेच ऑरेंज केक करावासा वाटू लागलाच, पण सहजरावांच्या म्हणण्याप्रमाणे एऽवढी बदाम पावडर...?

काSSSSSSयपो छे....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 31/01/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या देशाची संस्कृती त्या देशाच्या सणांवरुन दिसते असे कोणीसे म्हंटले आहे. महाराष्ट्राची संस्कृती गणेशोत्सव दिवाळी पाडवा या सणांवरून दिसते. कोकणातला गणेशोत्सव हा अगदी आगळाच. कोकणी माणसाचा देवबाप्पाला पाहुणा म्हणून वाजतगाजत आणण्याचा उत्साह त्याच्या मनात वर्षभर गाजत असतो. गुजरातच्या पतंगोत्सवाबद्दल मी बरीच वर्षे ऐकून होतो . या वर्षी तो योग आला. संक्रान्तीच्या दिवशी गुजरातची पतंगनगरी अहमदाबाद ( गुजरातीत अमदावाद) मध्ये होतो. संक्रान्तीचा मह्त्व म्हणजे दक्षीणायन संपून उत्तरायण सुरु होते.

[ज्योतिष] आयुष्यातील उत्कर्ष आणि मध्यबिंदू ज्योतिष

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 31/01/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय ज्योतिषात योग ही एक गुंतागुंतीची कल्पना आहे. त्यात राजयोगाला विशेष स्थान आहे. राजयोगाची फले अनेक असू शकतात पण सहसा एका सामाजिक स्तरातून दूसर्‍या वरच्या सामाजिक स्तरात जाणा-या प्रयत्नवादी, धडपडणा-या व्यक्तींच्या पत्रिकेत राजयोग किंवा इतर शुभ योग कार्यरत असल्याचे मानाले जाते. पण इथे एक गोची आहे, ती अशी की भारतीय ज्योतिषात शुभ योग सतराशे साठ आहेत, शिवाय ते बाबा आदम च्या काळातले आहेत. राजयोगाना निष्फ़ल करणारे योग सतराशे साठ गुणिले दोन (कदाचित जास्तच) आहेत. त्यामुळे भारतीय ज्योतिष वस्तुनिष्टपणे अभ्यासणा-यांची भंबेरी उडते. पाश्चात्य जोतिषात इतकी गुंतागुंत दिसून येत नाही.

राख होऊन मेला : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 31/01/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
राख होऊन मेला : नागपुरी तडका हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला ....॥१॥ पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला ....॥२॥ महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली? हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला?

ही मुस्कटदाबी का?

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 31/01/2011 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुहृदयसम्राटांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेला हा धागा धागाकर्त्याच्या विनंतिनुसार हा धागा वाचनमात्र करण्यात येत आहे. या तळटीपेसकट आता बंद झाला आहे. याचा अर्थ धागाकर्त्याने या धाग्यात काहीही लिहावे आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची सोय बाकी असू नये अशी योजना संपादक मंडळाने करुन दिली आहे असे दिसते. या धाग्यात धागाकर्त्याने काही मौलिक वाक्ये लिहीली आहेत.

साईबाबा आरती- सुधारणा सुचवा

लेखक चिरोटा यांनी रविवार, 30/01/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, महाराष्ट्राबाहेर काही साईबाबांची मंदिरे आहेत तेथे अनेक प्रकारच्या आरत्या म्हंटल्या जातात. बेंगळूरमध्ये काही मंदिरांत साईबाबांची आरती मराठीतच म्हंटली जाते. आरती मराठीत असली तरी लिहिली असते कन्नड लिपीमध्ये.