Skip to main content

3D

लेखक स्पा यांनी शनिवार, 16/04/2011 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मागे दोन लेखात मी म्याट पेंटिंग नावाचा प्रकार फोटोशॉप मध्ये करून दाखवला होता पण खरतर मला माझं 3D च काम इथे दाखवायचं होत, पण कामामुळे वेळ मिळत नव्हता. परवा शेवटी थोडा वेळ मिळाला म्हणून एक सेट डीझाईन केलाय. छोटासाच आहे. आम्ही जे काम करतो याची छोटीशी झलक . बेसिकली आम्ही interior किंवा exterior बांधून होण्याच्या आधीच ते 3d मध्ये बांधतो :) खरोखर बांधकाम पूर्ण झाल्यावर ते कसं दिसेल याची ती झलकच असते म्हणा ना, यामुळे क्लाएंटला समजतं कि तो एवढा पैसा ज्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणार आहे , ते शेवटी दिसेल कस? यामुळे बर्याच गोष्टी साध्य होतात किंवा सोप्या होतात १.

पुणेरी मिसळची 'सेंच्युरी'

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 16/04/2011 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील आद्य मिसळ अड्ड्यास १०० वर्षे पुर्ण होत आहेत. रवीवार पेठेतील रेल्वे बुकिंग ऑफीस शेजरी असलेले "वैद्य उपहार गृह" हे ते ठिकाण. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर ९९ पुर्ण करून शतकी वर्षात प्रवेश करीत आहे. या निमीत्त सकाळ मधे एक लेख आला आहे. तो पुढील प्रमाणे पुणेरी मिसळची 'सेंच्युरी' पुण्याची वैशिष्ट्ये अनेक. पुणेरीपण जपणारी. पुणेरी मिसळ त्याच परंपरेतली. पुणेरी मिसळ म्हटले, की हमखास तोंडावर येते वैद्यांची मिसळ.

कोण होतास तू... कोण होतीस तू

लेखक नीलांबरी यांनी शनिवार, 16/04/2011 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेपाच वाजता कोणाचातरी गजर मोठ्ठ्यानं किंचाळत असतो. अपार्टमेंटमधे रहायचं म्हणजे हा एक त्रासच. भिंती फार मजबूत नसल्या की आजूबाजूचे सगळे आवाज कसे अंगावर धावून येतात. गजराचा मालक आता बंद करेल, मग बंद करेल म्हणून मी पांघरूण कानापर्यंत ओढून घेते. पण गजर अविरत ओरडतच राहतो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात येतं की हा गजराचा आवाज माझ्याच उशाजवळून येतोय... चरफडतच मी उबदार पांघरुणातून बाहेर येते. बाहेरच्या खोलीतून रोजच्यासारखे चित्रविचित्र आवाज येतच असतात. कुणीतरी भारतातून रामदेवबाबांची सी. डी. (हो, तेच ते योगा गुरू वगैरे वगैरे...) पाठवल्यापासून नवरा रोज नेमानं कपालभाती वगैरे क्रिया जोमानं करतो.

पाऊस माझा

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं.

आकुंचन

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
कोठे गेले पूल, कोठे गेले रस्ते, सापडत नाहिये व्यायामशाळा मुलांचे दप्तर, वह्या अन झब्बे अन आज काय तर गेले पाणी अन सोबत गेल्या वाहूनी जल-वाहिन्या दॄष्टीहिनास मिळाला आज काय सांगू जड-वाहन चालविण्याचा परवाना गल्ली-बोळात गरज तिथे उभा आज वैद्यकिय सहाय्य्कांचा दवाखाना ओरबाडली गेली लज्जा कुणाची दमटवले गेले कुणाला दाबली जमीन कुणाची तर खल्लासच केले कुणाला अपंग व्यवस्था, लुळे कायदे लुटले गेले आज भर चौकात मज दिसलेच नाही हे सगळे काय सांगू 'व्यस्त' होतो मी 'जवळचे' बघताना लोचट-गिरी ला उरले नाही वय पाहावा तिथे रोग मानसिक विकॄती चा लहान असो वा मोठी - लाज कुणाची तिला वरतून खाली बघातांना साठे झाले जप्त, सा

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/04/2011 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!! आदरणीय अण्णा, आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली.

महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी

लेखक अजातशत्रु यांनी शुक्रवार, 15/04/2011 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले. वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते, पण इथेही भा.ज .पा.