Skip to main content

जगदीश खेबुडकर कालवश......

लेखक मनराव यांनी बुधवार, 04/05/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, गीतकार श्री. जगदीश खेबूडकर (१० मे १९३२ - ३ मे २०११ ) यांचे मंगळवार दुपारी सव्वा दोन वाजता निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या बद्द्ल काही अधिक माहिती असल्यास धाग्यावर टाकावी............

भिगवण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/05/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो....

भिगवण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/05/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो....

ज्योतिष - भाकीताचा पडताळा

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 03/05/2011 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी दिनांक १९ एप्रिलला माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या पोस्ट मध्ये आजची अमावस्या मोठ्या जनसमुदायासाठी अत्यंत शुभ ठरेल असे भाकित वर्तवले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेन वर केलेल्या कारवाई नंतर माझे भाकित नि:संशय खरे ठरले आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या तडाख्याच्या भाकिता नंतर वर्तवलेले हे दूसरे मोठे भाकित खरे ठरले याचा मला आनंद वाटतो. माझ्या या भाकितावर अनेकजण अचूकता नसल्याचा आरोप करतील, पण माझ्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही. कारण ज्योतिषात "कोअर इश्यु" जास्त अचूक पणे वर्तवता येतात.

वास्तव

लेखक मराठे यांनी मंगळवार, 03/05/2011 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्यांदा राहुल आरशात डोकावला. गळ्यातली सोन्याची चेन आत टाकत, कोपर्‍यातल्या तंबोर्‍याकडे नजर टाकली. कधी नव्हे ते राहुलला आजच्या कार्यक्रमाआधी थोडी जास्त धाकधुक वाटत होती. अर्थात त्याला कारणही तसंच होतं. मुंबईतला त्याचा हा पहिलाच कार्यक्रम होता. काही तासांपुर्वीच थेटर हाऊसफुल्ल असल्याचं त्याला कळलं होतं. आणि जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तशी तशी त्याच्या मनातील हुरहूर वाढतच होती. राहुल गाण्याचे मेळावे करायला लागल्या पासून त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती. लोकांना त्याचं गाणं, त्याचा आवाज खूपच आवडत होता.. इतका की लोक त्याची तुलना संगीतक्षेत्रातल्या दिग्गजांशी करायला लागले होते.

शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/05/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
सबसिडी कुठाय? गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते. शाळा-कॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा ‘शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्या-वाचण्यात आला. अगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोय; पण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीये. बहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही ‘शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की काय, किंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही ना? असा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहे.

शिट्टी अन सोडा

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 02/05/2011 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा धगधगू लागला की पोटातली भगभग थंड करण्याकामी चौक गाठावा लागायचा. तिथे मन्सूरभाईचा दाढीमय चेहरा आपल्या हातगाडीभोवती जमलेल्या गर्दीतून कधीतरी झळकायचा. तो सतत आपल्या कामात गर्क असलेला दिसायचा. भर उन्हात काहिली कमी करावी म्हणून पावलं आपोआप मन्सूरभाईच्या गाडीकडे वळायची. त्याची हातगाडी म्हणजे रंगीबेरंगी थंड पेयांचं आगरच होतं. बर्फाचा तुकडा किसून छोट्या ग्लासात काडीसह दाबायचा व अखंड बाहेर काढून त्यावर तिरंगी वेगवेगळ्या बाटल्या उपड्या करुन रंगकाम केले की झाला दिलचाहा बर्फाचा गोळा तयार! तो काडीने आडवा धरुन त्यातील थंड गोड पाणी सुर्रऽऽ करुन पिणे म्हणजे रणरणत्या दुनियेत शितलतेचा अमृतवर्षाव ठरायचा.