Skip to main content

वडापावची कहाणी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 19/06/2011 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
वडापाव-ललित लेख शेवाळ्याचा दगडाला चिकटुन रहाणे,हा स्थाईभाव आहे.त्याच प्रकारचा स्थाईभाव घेऊन हा पदार्थ जन्माला आला.वडा हा भारतीय खाद्य संस्क्रुतितला पदार्थ पावाला ईंग्रजांच्या आमदानीत चिकटला असावा.हे दोन्ही पदार्थ एकमेकाला असे काही चिकटले,की त्यांच वेगवेगळ अस्तित्व ,हे एकमेकाशिवाय सिद्ध करता येत नाही.किंवा सिद्ध करायला गेलं,तर काही ठिकाणी सिद्ध करणाय्राचा वडाच झाला असं दिसुन येईल.

चांदया म्हशीची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 19/06/2011 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कसा काय मंडली. सगला ठीक हाय ना. मंग हारकत नाय. मी पन बरा हाय. काय? मना नाय वलकलाव. मी दिप्या. धन्याचा शालेतला आनी आक्रावी बारावीचा दोस्त. मी आज तुमाला धन्याच्या चांदया म्हशीची गोष्ट सांगनार हाय. आता तुमी म्हनाल म्हशीची काय गोष्ट आसनार. पन हाय. कारन ही गोष्ट फकस्त म्हशीची नाय. ही गोष्ट जशी धन्याच्या चांदया म्हशीची हाय तशीच ती धन्यासारखा बॉरखांडयात म्हशी राकनारा पॉरगा आमेरिकन येनाराय कसा झाला त्याजीपन हाय. आता उगंच हिकडचा तिकडचा सांगत नाय. येकदम गोष्टीला सुर्वात करतो. धन्याचं बाबा गोरेगावच्या गरम पंचायतीत कामाला व्हतं. गोरेगांव आम्च्या गावाजवलचा म्हॉटा शेर. बाजारपेट हाय तितं. सगला मिलतो.

राजा रायगड

लेखक गणेशा यांनी रविवार, 19/06/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
३ जुनच्या संध्याकाळीच लोणावळ्यामध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या सरी धुंद करत होत्या, तरीही मनाला वेध लागले होते उद्याच्या रायगड ट्रेकचे. रायगड हा शब्दच शिवरायांची.. जाणत्या राजाची आठवण मनात उत्तेजित करत जातो.., ६ जून शिवराज्याभिषेक दिन, या पवित्र दिनासाठी रायगडावर जायचे भाग्य लाभते आहे, हेच आमचे नशिब होते. आणि माझे मन भरकटले होते त्यावेळेसच्या दिमाखदार सोहळ्याच्या स्वप्नांमध्ये. त्या वेळीही अशाच सरी कोसळत असतील... अखंड आसमंत शिवाराज्याभिषेक करण्यास उत्सुक असेन.. राज्यातील प्रत्येक माणुस राज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची अशीच वाट पाहत असेन..

दहावीचा निकाल.

लेखक तर्री यांनी रविवार, 19/06/2011 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा निकाल नुकताच लागला होता. वर्तमान पत्रामध्ये गुणवान मुलां-मुलींचे सचित्र कौतुक सुरु होते. डॉ.अनिल आपल्या तासावर भाड्याने घेतलेल्या कन्सलटिंग रूम मध्ये पोहोचले. आज एक-दोनच अपॉईंटमेंत्स होत्या . सेविकेने वर्तमान पत्रे समोर ठेवली . वाचता वाचता डॉ़क्टर एकदम भूतकाळात गेले. बारा वर्षापूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस आठवून त्यांचे अंग शहारून आले. फर्स्ट एम.बी.बी.एस. ला असताना अनिल को़कणात आजोळी आला होता. आजोबा गेल्यापासून अनिलचे आजोळ आटले होते. तोही आता कॉलेज-कामात अडकत चालला होता. अनिल खूप हुशार होता. दहावीला तो बोर्डात येणार हे जणु सर्वानी गृहित धरले होते. पण झाले भलतेच.

दमलेला बाबा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/06/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते.

मोहोर

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 19/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे उपोषणांवर वांझपणाची उमटलेली मोहोर आहे आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे जन्मानंतर तोडती नाळ जणू कापलेला दोर आहे अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

Intrepid Sea, Air & Space Museum, New York

लेखक येडा अण्णा यांनी रविवार, 19/06/2011 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क मध्ये येवुन जवळपास दिड वर्ष झाले होते तरीही Intrepid Museum ला जायचा योग काही येत नव्हता. अखेर या शनिवारी तो योग आला.