Skip to main content

कविता - आस्वाद

लेखक शुचि यांनी शनिवार, 27/08/2011 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
"कविता" हा माझा जीव की प्राण असा साहीत्यप्रकार आहे. कवितांमध्ये असलेली भावना चेतविण्याची क्षमता हाच पैलू नाही तर थोड्या शब्दांत खूप काही मांडण्याची आणि मनावर शाश्वत छाप सोडण्याची क्षमता हे कवितेचे अन्य पैलूदेखील अतिशय आकर्षक आहेत. अतिशय अर्थवाही असा हा साहीत्यप्रकार आपल्याला तर बुवा खूप आवडतो याचा अर्थ कळतोच असे नाही. वेड मात्र जबरदस्त आहे. मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे.

...

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
...

.

लेखक प्रियाली यांनी शनिवार, 27/08/2011 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
.

मिसळपाव माझ्यासाठी

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 27/08/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक मिसळकरांना असे वाटते मिसळपाव ही माझ्यासाठी काय आहे ? यापेक्षा मिसळपाव काय नाही ! हे माझे घर आहे इथेच मुक्काम करावा हलूच नये, हे माझे अन्न आहे, ते खाल्ल्याशिवाय आमचे पोटच भरत नाही मिसळपाव काय आहे नेमके ---साध्य की साधन.... ? ?? काय आहे तुमच्यासाठी मिसळपाव म्हणजे ? काय दिलं मिसळीनी आम्हाला... -- ज्यांचे पोट ठीक आहे त्यांनीच रतीब घालावा बाकीच्यांनी १ दिवस विश्रांती घेतली तरी चालेल सगळ्यांना त्रास नको

जनलोकपाल बिल नापास झाल्यावर तुम्ही कुणाच्या नावाने बोटे मोडाल?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 27/08/2011 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चेसाठी समजू या की तमाम विद्वान, "ठेविले अनंते तैसेची रहावे" ह्या वचनावर ठाम असणार्‍या विचारवंतांच्या रेट्यामुळे आणि निष्कलंक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने जनपाल बिल नापास झाले. सगळी मंडळी आपापल्या घरला गेली, अण्णा जिवंत असले तर राळेगणशिंदीला रवाना नाहीतर पंचत्त्वात विलीन झाले असे समजू . मला उत्सुकता आहे की पुढचा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार उघडकीस येईल आणि परमपवित्र संसद आपल्या परमपूज्य सदस्यांच्या तोंडातून जेव्हा असे आश्वासन देईल की (नेहमीप्रमाणेच) चौकशी चालू आहे, निर्णय झाला तर आणि की शिक्षा होईलच. तेव्हा आपण कुणाच्या नावाने बोटे मोडाल? चर्चेच्या आधारासाठी काही मुद्दे १.

अण्णा हजारे, आता बास करा !

लेखक अप्पा जोगळेकर यांनी शुक्रवार, 26/08/2011 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय अण्णा, गेल्या पंधरा दिवसांमध्ये जनलोकपाल बिल आणि भ्रष्टाचार विरोध हे मुद्दे आधारभूत धरुन तुम्ही जी अभूतपूर्व चळवळ उभी केली आणि त्याला जे जबरदस्त यश मिळाले त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. सुरुवातीला मुजोर वाटणारे सरकार लोकांच्या दबावामुळे अंशतः का होईना पण झुकले हे या चळवळीचे मोठेच यश म्हटले पाहिजे. पण त्याहीपेक्षा मोठी आणि नमूद करण्याजोगी अ‍ॅचिव्हमेंट ही की या निमित्ताने चेकाळलेल्या सरकारपर्यंत एक धोक्याचा मेसेज गेला. आपण आपल्याला हवे तसे उन्मत्तपणे आणि मस्तवालपणे वागू शकतो, आपल्याला कोण विचारणार अशा मस्तीत सरकार वावरत होते. ती धुंदी उतरली.

संपादकाचे घासूगुर्जीस पत्र..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 26/08/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय राजेश घासू आण्णा यांसी, जय मिपाराष्ट्र! एका विशेष नात्याने ही पत्रवजा विनंती आपणास करीत आहे. मिपाकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. समज आणि गैरसमजाच्या वावटळी उठत असतात. तुम्ही काय आणि आम्ही काय... त्यातून सुटलेलो नाही. काही असले तरी आपल्या संपादकांबद्दल असूया कवितेच्या पाककृती विषयक लेखाविषयी आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. सध्या आपण मिपाच्या मर्कटलीला मैदानावर एकूणच पिडीत लोकांसाठी स्लटवॉक नामक जबरदस्त युद्ध पुकारले आहे.

पुणेरी वाहतूक

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 26/08/2011 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
चालणारा, दुचाकीस्वार, चार चाकी चालवणारा ह्यांचे स्वगत : पुढे मागे करत करत रस्ता कसाबसा मी ओलांडला "काय मेले गाडीवाले चालवतात" असा विचार मनास चाटून गेला फूटपाथ वरून चालणं देखील झालंय भलतच मुश्किल काही भरवसा नाही; त्यावरूनही ही लोकं गाड्या हाकतील हे मोठे गाडीवाले करतात भलताच माज असे रस्ते आडवून गाड्या चालवतात जणू काही ह्यांचच आहे राज आम्हा गरिब दुचाकीस्वारांना अगदी कोपर्यात घालतात पावसाळा असला तर विचारयलाच नको; सर्रास चिख्खल उडवून जातात ह्या दुचाकीवाल्यांना चालवण्याची अजीबात नाही शिस्त लेन न पाळणार्यांचा तर परवानाच केला पाहिजे जप्त रस्यावर चालणारे तर बागेत असल्यासारखे फिरत असतात कुठे कुठे आणि

एक महाभयंकर जात

लेखक रोमना यांनी शुक्रवार, 26/08/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक महाभयंकर जात खरे पाहता, "जात" हा शब्द दर्शवितॊ ते वर्गीकरण. जसे की सजीवांमध्ये - प्राणी, पक्षी, माणूस, वनस्पती वगैरे. यामध्येही अनेक पोट जाती असू शकतात जसे की, शिकार करणारे प्राणी, शाकाहारी वगैरे. माणसाने हि आपापल्या जाती बनविल्या. माणसाच्या जाती मुख्यत: त्याचे स्थळ, तो करतॊ ते काम, त्यानुसार रहाणीमान दर्शविण्यासाठीच होता. पण या जातीचा चुकिचा अर्थ ज्यांनी पसरविला, वाढवला व पॊसला ती एक महाभयंकर जात आहे.

जनलोकपाल आल्यानंतर तुम्ही कोणाविरुद्ध पहिली तक्रार कराल?

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 26/08/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
(चर्चेसाठी आज समजुया की) लोकांच्या प्रचंड पाठींब्यापुढे काहिहि न चालल्याने या (नाकर्त्या, षंढ, माकड वगैरे वगैरे राजकीय पुढार्‍यांनी) जनलोकपाल जसेच्या तसे संमत केले आहे. मला उत्सुकता आहे की जनलोकपाल (अगदी जसेच्या तसे) आल्यानंतर सामान्य जन कसे वागतील आणि या कायद्याचा उपयोग करुन घेतील? चर्चेच्या आधारासाठी काहि नोंदी इथे देत आहे १. जनलोकपालविधेयकातही केवळ केंद्रीय कर्मचारी समाविष्ट आहेत २. तक्रार करतेवेळी इतपत पुरावा हवा की प्रथमदर्शनी लोकपाल संस्थेला गुन्ह्यात तथ्य वाटले पाहिजे ३. राज्यस्तरावरील तक्रार लोकायुक्ताकडे करता येईल (मात्र त्याला शिक्षा करण्याचे अधिकार नाहित).