Skip to main content

जनलोकपाल च्या निमिताने.

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 13/09/2011 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता डोक्यावर त्याच्या कुणा संताची पालखी होती गडबडलेल्या वनराजाला शिकार हि नवखी होती सावज टप्प्यात असून सुद्धा झेप त्याची पोचत नव्हती कोल्हया लांडग्यांची नख सुद्धा गोळ्याला त्या डाचत नव्हती गुहेमध्ये जाऊन त्याने काही वर्ष चाळली काळ थोडा मागे करून युग थोडी पाहिली किडे मुंग्या हरणं ससे चिरडलेली अनेक मनं इतिहासाच्या पुस्तकातली रक्तबंबाळ किती पानं पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास
काव्यरस

मासे ३३) कलेटं

लेखक जागु यांनी मंगळवार, 13/09/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
कालेटं ही ओळखायला अगदीच सोप्पी. त्यांचा लाल्-गुलबट रंग असतो. दिसायला ही जरी कशीचतरी दिसली तरी ह्ही खाल्याने रक्त वाढते असे म्हणतात. कालेट स्वस्त व चवदार असतात. शक्यतो हे तळूनच चांगले लागतात.

बंदुक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी ही हसलो त्यांना ज्यांनी मला वाचवले प्रेताशिवाय सर्वांना स्मशानात पोहचवले एकटा जसा तो उठला मुर्ख म्हणोनी हिणविले संख्येच्या या निकषाने विद्वान किती बसविले प्रेतासम हे जगणे जगतो मी तिरडीवर नियतीचा कैसा घोट पडतो जसा नरडीवर मैत्री मी निभावुन मैत्र जमवले पक्के अपयशावरही माझ्या मित्रांचे होते शिक्के देताना निरोप तुजला तु अंधुन अंधुक होते वक्षात देऊनी गोळी ती आठवण बंदुक होते
काव्यरस

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार? (Times of India मधील बातमीचे भाषांतर) स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्‍हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली.

गौतम राजाध्यक्ष यांचे निधन (मटा ऑनलाइन वृत्त)

लेखक सुकामेवा यांनी मंगळवार, 13/09/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले.

अशोक चव्हाण, सोनाली कुलकर्णी आणि म्हाडा.

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 13/09/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाजनहो, आमच्या माहितीप्रमाणे सामान्य माणसाला मुंबईमध्ये, त्यातल्या त्यात कमी दराने तसेच लॉटरी पद्धतीने नावे काढून राहत्या घरांची सोय करणारी संस्था म्हणजे म्हाडा. आमच्या आठवणीप्रमाणे आणि माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरवातीच्या कारकिर्दीत त्यांनी सोनाली कुलकर्णी (नटरंग फेम. मुक्ता किंवा दिल चाहता है फेम नव्हे,) या मराठी सिने-अभिनेत्रीला म्हाडातर्फे मुंबईत राहते घर बहाल केले आहे.

गणेशोत्सव २०११

लेखक साबु यांनी मंगळवार, 13/09/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो... फोटो पुन्हा डकवले आहेत.... ऋषिकेश आणि स्पावड्याशी सहमत... बहुतेक अति पोस्ट प्रोसेसिंग फोकस झाले आहे आणि ब्लर खूपच झालेत... फोटो उडवले कारण मला उगीचच वाटले की सवन्ग प्रसिद्धि करता मी हे केले आहे.. @ऋषिकेश, हो तो फोटो श्री श्री श्री रविशंकरांचा आहे.