काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी.