लेखकसन्जोप रावयांनी गुरुवार, 03/11/2011 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
तिची आणि माझी पहिली भेट अगदी अलीकडेच झाली. त्या आधी ती कोण, काय मला माहितीही नव्हते. काही कारणाने मी तिच्या वडीलांना फोन केला होता. तो तिने उचलला.
"हॅलो, कोण बोलतंय?...." ती इतक्या जोरात म्हणाली की मला माझा फोन कानापासून जरा लांब न्यावा लागला. आवाज एकदम खणखणीत. भाषेला थोडासा हेल . थोडासा कोल्हापुरी, थोडासा अमराठीही.
"हॅलो... बाबा.... आहेत का?" मी चाचरत विचारले.
"ह्हो..." पुन्हा तसाच ठसकेबाज आवाज."बाबा, तुझा फोन आहे."
मग मी तिच्या वडीलांशी वगैरे बोललो. नंतर लवकरच त्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. त्यावेळी मी तिला पहिल्यांदा बघीतले.
लेखकसोत्रियांनी बुधवार, 02/11/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली.
लेखकमराठमोळायांनी बुधवार, 02/11/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
दिवाळी संपली, फराळही संपला. म्हंटल एखादी झणझणीत आणि आवडती डिश हाणुया. :) आता गणपा महाराजांसारखा स्टेप बाय स्टेप पाककृती समजावण्याईतका माझा पेशंस नाही, पण तरी एक छोटासा प्रयत्न करतोय.
जिंजर चिकन ड्राय हा माझा फार आवडता प्रकार आहे.
साहित्यः
१. लाल तिखट - सकाळी ऑफिसला जायचे आहे की नाही त्याप्रमाणे.
२. तेल - पोटाच्या घेरानुसार
३. मीठ - ब्लड प्रेशर नुसार
४. कांदा मध्यम - शक्यतो पांढरा (कमी उग्र असतो म्हणून, शक्य तितका बारीक चिरून)
५. आले - खालच्या चित्रावर फुटपट्टी लावून ईंच मोजुन घ्या.
लेखकजयवीयांनी बुधवार, 02/11/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
फिरते आहे घेऊन, जखम एक ठसठसती
खपली आहे वरती पण आतून भळभळती
वरपांगी कमालीचा ... हसरा चेहरा
आतून पार भेदरलेला, भित्रा नि बावरा
आविर्भाव आहेत सारे, जग जिंकल्याचे
शल्य सदा काळजात, सारे हरल्याचे
सवयीचं होतंय आता, हुकमी हसू
कधी मात्र दगा देतात, आपलेच आसू
असेल का सोपं यापेक्षा अश्वत्थाम्याचं जिणं
जखम दाखवत जगाला, तेल मागत फिरणं
जयश्री अंबासकर