Skip to main content

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 05/11/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध : यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो. गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का?

पाट्यांसाठी भारी !!!!!!

लेखक स्वतन्त्र यांनी शनिवार, 05/11/2011 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या रविवार पेठेत दिवाळीच्या खरेदी साठी गेलो होतो.दिवाळीच्या फराळाचा दिवाळीआधीच 'ओवरडोस' झाला असल्याने घसा जरा दुखत होता.म्हणून 'विक्स' घ्यायला तिथल्याच मेडीकल दुकानात गेलो. हल्ली काही लोकं डॉक्टरांच्या प्रेस्क्रीपशन शिवाय औषध घेतात.त्यासाठी तेथील दुकानदाराने काचेच्या टेबलाखालीच गोळ्या आणि त्यावर पाट्या लावल्या होता. फोटो मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलेले आहेत त्यामुळे जरा धूसर आहेत.तेवढा कृपया सांभाळून घ्या. सगळ्या पाट्या आणि गोळ्या.

Acacia

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 05/11/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष. डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.

नटरंग

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 05/11/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का?? मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले? अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला.

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता

लेखक gaikiakash यांनी शनिवार, 05/11/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी- १४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.

पालेस्टाईन बद्दल भारताचे युनोस्कोतील मतदान

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 04/11/2011 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर ही चर्चा सुरु होईल असा अंदाज होता. पण ती न झाल्याने मिपा करांचे मत जाणून घेण्यासाठी हा धागा काढत आहे. पश्चिमात्य तसेच अरब वर्तमानपत्रांत सोमवारी एक खूप गाजलेली बातमी भारतीय वृत्तपत्रात ना येवढी गाजली ना त्यावर टिव्हिवर चर्चा झाल्या. सोमवारी म्हणजे ३१ आक्टो ला पॅलेस्टाईनला युनोस्कोत मतदानाच्या प्रक्रियेतून सदस्यत्व मिळाले. ज्या संस्थेनं (पॅलेस्टाईन) इस्त्राईलला, पर्यायाने युनोच्या एका पूर्ण सदस्यालाच, मान्यता दिलेली नाही अशा संस्थेने मतदानात युनोस्कोचे सदस्यत्व दणदणीत विजयाने मिळवले. या घटनेचे अनेक कांगोरे आहेत. त्याचे दूरगामी पडसाद भारतापर्यंत सुद्धा पोचले जाऊ शकतात.

पुस्तक हवे आहे?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/11/2011 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
काय वाट्टेल ते होईल : हेलेन आणि जॉर्ज पापाश्विली : अनु: पु ल देशपांडे ANYTHING CAN HAPPEN — George and Helen Papashvily रशीयातील जॉर्जीया देशातून अमेरीकेत स्थलांतरीत झालेल्या एकाची कथा. स्थानिक ( इम्ग्रजी) भाषेचा गंध देखील नसताना हा पठ्ठ्या अमेरीकेत स्थायीक झाला त्याची कथा. पुलंनी केलेल सुंदर अनुवाद. खरेतर अनुवादाचा एक वस्तुपाठ ठरावा असे पुस्तक. मात्र दुर्दैवाने इतक्या चांगल्या पुस्तकाचे मूळ इम्ग्रजी पुस्तक तसेच मराठी अनुवाद कुठेच उपलब्ध नाहिय्ये कुठे मिळत असेल तर हवे आहे. कोणाकडे असल्यास विकत घेईन अथवा झेरॉक्स मिळाली तरी चालेल. व्यनी/फोन करावा.