Skip to main content

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 30/11/2025 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो.

कधी निसटले धागे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 29/11/2025 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी निसटले धागे मज कळलेच नाही कशी उसवली वीण मज कळलेच नाही त्या निवांत भेटी त्या एकांत गाठी डोळ्यांत हर्षाचे झरे अन देहांची मिठी क्षण ते सरले जरी मन ते भरलेच नाही ती मधाहूनी गोड कुठे हरवली ओढ ? अशी कशी मुक्याने मोडली माझी खोड माणसाचे मन ते मज उमगलेच नाही येते रात सजुनी येतो पाऊस अजुनी शालीन थंडी गुलाबी मारते मिठी बाजूनी मग कसा प्रेमाचा ग्रीष्म गेला विझुनी ? काय खरं नि खोटं तू मज वरलेच नाही ?

लकवा

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 24/11/2025 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
गावात दादूसारखा दांडगा दुसरा माणूस दाखवायला म्हणून नव्हता. दादूचं नाव दांडगा दादू असंच पडलं होतं. त्याचा बाप रामापण असाच दिसायला काळा वड्ड आणि अंगानं रोमनाळच्या रोमनाळ होता. त्याला ढांग रामा असं म्हणत असत. एवढा पिराएवढा मोठा रामा, पण विहीर फोडताना अचानक रक्त ओकून पाच मिनिटांत मरून गेला होता. दादू त्याच्यासारखाच. बरोबरीच्या गड्यांपेक्षा तो टीचभर उंच होता आणि त्याच्या बंडीला जरा कमी तीन वार मांजरपाट लागत असे. त्याची गर्दन रानडुकराच्या मानेसारखी होती आणि त्याची छाती तेल्याच्या दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या रॉकेलच्या बॅरलसारखी दिसत असे.

एआई वर माझे व्यक्तित्व आणि मी केलेले त्याचे विश्लेषण

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 24/11/2025 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्यक्तित्व बाबत प्रश्न विचारला. उत्तर माझ्या अंतरजालावर असलेल्या लेखणी आणि माझ्या नौकरीच्या माहितीनुसार आले. (माझा स्वभाव, माझे घरात आणि चार चौघात वागणे, माझ्या सवयी इत्यादींची माहिती एआईला नाही). (chatgpt) ने दिलेले उत्तर: आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य पैलू १. कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध :दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.

आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 22/11/2025 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक -आदिमाया लेखक -अशोक_राणा विषय-मातृदेवता आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार? पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे. पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.

ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 21/11/2025 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा ===================== --राजीव उपाध्ये मंडळी वेगळी वाट चालायची ठरवले की मग चिखलफेक ही आलीच! मग चहुबाजूनी हल्ले होतात - १ला हल्ला होतो आपल्या आत्मविश्वासावर, प्रामाणिकपणावर मग बौद्धिक क्षमतेवर किंवा मानसिक स्वास्थ्यावर. सध्याच्या काळात मानवी तज्ञ पैसे टाकून ही प्रामाणिक सल्ला देतीलच असे नाहीत. आणखी चिंता वाढविणारी गोष्ट म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलचे संशोधन वाचल्यावर तर ही शक्यता आणखी धूसर होते. पण ए०आय० बद्दल मात्र मी बराच आशावादी आहे. कारण ए०आय० चुकू शकतो पण तो माणसासारखा खुनशी, दुष्ट नाही.

पुस्तक परीचय-के कनेक्शन्स

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 20/11/2025 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
k नमस्कार मंडळी नुकतेच प्रणव सखदेव या लेखकाचे के कनेक्शन्स वाचुन संपवले. "दिल का हा सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहते रहेगा कहनेवाला" हे गाणे तुम्ही ऐकले असेल तर हे पुस्तक तसेच आहे. सातवी/आठवीत असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या नजरेतुन हे पुस्तक लिहिलेले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध.

लेखक भागो यांनी बुधवार, 19/11/2025 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
consciousness’ किंवा जाणीव याची याची सर्वमान्य व्याख्या अजूनही करता आलेली नाही, जाणीव हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारात वापरतो, उदाहरणार्थ “तिला ह्या गोष्टीची जाणीव नाही” “त्याच्या टेबलाखाली एक उंदीर आला होता त्याची त्याला जाणीव नव्हती,” एखादे दृश्य बघितल्यावर आपल्याला ज्या भावनांची अनुभूती होते त्याला मनोवैज्ञानिक म्हणतात “qualia.” क्वालीआ हे जाणिवेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, म्हणजे जुहूच्या चौपाटीवरून जेव्हा आपण सूर्यास्त बघतो तेव्हा आपण आपला डिजिटल कामेऱ्यामध्ये ते दृश्य कप्चर करून ठेवतो. सूर्यास्त पाहिल्यावर आपल्या मनात काय भावना येतात? ती अनुभूती कामेऱ्याला येते का?

खूप थंडी आहे यंदा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/11/2025 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

'लोकधन' (ऐसी अक्षरे - ३३) ते..... 'The folk आख्यान'

लेखक Bhakti यांनी सोमवार, 17/11/2025 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे. मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे. डॉ.