कथा : आमची गोष्ट
शबिना:
मी शबिना, माझ्या पोस्ट ग्रॅडच्या शेवटच्या वर्षात प्रेमात पडले मी आनंदच्या. आमच्या कॉलेजच गॅदरिंग बघायला आला होता, आमची ओळख वाढली आणि त्यानी लग्नाचं विचारल्यावर मी होकार देऊन टाकला. तो जोशी, मी तांबोळी! आमच्या पुढचा रस्ता काही फार सहज सोपा नसणार हे ठाऊक असून देखिल आम्ही सगळं निभवायच ठरवलं. माझ्या सासरी, आमचं लग्न म्हणजे एक मोठा धक्काच होता. त्यांच्या घरी माझ्या हातच पाणी देखील चालेल की नाही असं त्यांच्या वागण्या बोलण्यातून वाटत रहायचं. लग्नाआधीच्या दोन वर्षात फार वेळा नाही गेले मी त्यांच्याकडे, पण मनापासून कधी स्वागत नाही झालं माझं हेही तितकंच खरं. ते राहायचे शहराच्या मध्यवर्ती भागात.
मिसळपाव