कथा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
---------- अलिकडं ------------
सगळ्यात आधी त्यांना जाणवला तो निसर्गाच्या सर्व हालचालींनी गजबजलेला एकांत. कुठलाही गोंगाट नाही. काटेरी झुडुपांवरून सर्र असा आवाज करत वाहणारे वारे. पक्षांची किलबिल. तळपायाखाली एखाद्या सपाट दगडाची रुतणारी ऊब.
शहरातल्या घरातल्या मधल्या डिजिटल भिंतींना कंटाळून ते इथे भटकत होते. त्या भिंतींच्या आत तीच रोजची 32k पिक्सेलमधली भांडणं करून ते वैतागले होते. ज्या ज्या त्रासदायक आठवणी ते काढत त्या त्या भिंतींवर लगेच प्रोजेक्ट होत. ती किंचाळायची, “तू मला कंट्रोल करू बघतोस”.
मिसळपाव
या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत.