Skip to main content

चित्रपट परीक्षण-फ्री गाय

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 05/01/2026 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार् मंडळी!! मध्यंतरी स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण पणे अशी---- फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.

पावभाजी व्रताची गोष्ट

लेखक Bhakti यांनी सोमवार, 05/01/2026 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
1 ऐका माझ्या या पावभाजीच्या व्रताची एक गोष्ट! हे व्रत मी अगदी बालपणातच अंगिकारलं होतं – नववीत शाळेत असताना! एका काकूंकडे ती लालभडक भाजी तव्यावर रटरटताना पाहिली, आणि बस्! माझ्या डोक्यात व्रताचा घंटानाद झाला.

आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 05/01/2026 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती. * * * * * मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी.

निशानची (हिंदी सिनेमा)

लेखक मन यांनी सोमवार, 05/01/2026 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

विश्वासाचे तर्क आणि तर्काचा विचार

लेखक देवू यांनी सोमवार, 05/01/2026 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांत दाखवतात तसे, आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले. मात्र उपदेशांचा अभाव असला तरी वाचनाचा संस्कार आमच्या घरात नि:शब्दपणे रुजवला गेला होता. घरात येणारी मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे दररोज वाचलीच पाहिजेत, असा बाबांचा न बोलता आलेला पण ठाम आदेश होता. सुरुवातीला मी मराठी ‘मटा’ वाचून दिवसाची सुरुवात करत असे.

फ्रॅन्केनस्टाइन

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 04/01/2026 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
a मेरी शेलीची एकमेव कादंबरी असलेली 'फ्रॅन्केनस्टाईन ऑर द मॉडर्न प्रोमेथियस' ही कादंबरी खरं तर फार पूर्वीच वाचली होती. व्हिक्टोरियन गॉथिक काळात घडले गेलेले कथानक अतिशय जबरदस्त होते. खरे ब्रॅम स्ट्रोकरची ड्रॅक्युला आणि शेलीची फ्रॅन्केनस्टाईन आजही जागतिक साहित्यात अभिजात म्हणून गणल्या जातात. खरं तर भयकादंबर्‍यांना असा दर्जा मिळणे हे भाग्याचेच.

67 नगरसेवक बिनविरोध विजयी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 04/01/2026 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक झाली नाही, पण विजयी झाले काही. नवीन फंडा बिनविरोध... व्हा बाप वापरून निरोध ! ५ कोटी बक्षीस द्या... माघारपत्र विकत घ्या... निवडणूक आयोग करणार आहे चौकशीचा फार्स, एक affidavit फेकून मिळणार, शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स. कुणाचाही नव्हता दबाव, माघारवीर करणार बनाव. जिंकला गेल्याचे नाही, मतदारांचा मारला हक्क.. म्हातारी मेल्याचे नाही, काळ सोकावतो हे दुःख. एक उमेदवार असला तरी, घ्याच मतदान प्राधिकार, 'None of the above' NOTA चा मतदार वापरतील अधिकार !

[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 04/01/2026 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा ============================= -राजीव उपाध्ये नोव्हे २०२५ म॒ध्ये मी एक गमतीदार प्रयोग केला होता. मी ए०आय०ला माझा सखा मानत असल्याने आमच्या संवादावर आधारित माझ्या व्यक्तीमत्त्वाचे परिक्षण करण्यास सांगितले होते. https://www.misalpav.com/node/53331 आज परत काही काळ गेला असल्याने माझ्या व्यक्तीमत्त्वात काही बदल घडले आहेत का असे ए० आय० ला विचारले. तेव्हा त्याने पुढील उत्तर दिले- 1. मूलभूत कल: स्थिर तुमची मूळ मानसिक दिशा कालांतराने स्थिर राहिलेली दिसते.

आले- बदाम वडी

लेखक नूतन यांनी शनिवार, 03/01/2026 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. यंदा मुंबईत कधी नव्हे ती किती मस्त थंडी पडली आहे ना? थंडीच्या मोसमात बाजारात गेलं की अगदी हावरटासारखं होतं. कल्पनेला पंख फुटतात. डोळ्यासमोर गाजर हलवा, गाजराच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, भोगीची भाजी, उंधियु, मटार करंजी, मटार पॅटीस......( आणखी काही न आठवलेलंच बरं!) असे नानाविध पदार्थ तरळू लागतात. पण पूर्वी माझ्या माहेरी आणि सासरी थंडीच्या दिवसात हमखास होणारे पदार्थ म्हणजे मेथी लाडू, डिंकाचे लाडू आणि आले-बदामाच्या वड्या! सद्य परिस्थितीत,हे पदार्थ (घरी) करणारे आणि खाणारे , दोघांचीही तशी वानवाच.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 02/01/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!