व्यथा
आजच चेपूवर हे वाचले आणि मन सुन्न झाले.
एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण गावोगावची वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणार्या आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात. तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते? पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाली होती. (तिला त्या वर्षीचे ऑस्करदेखील मिळाले होते.) हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते.
मिसळपाव