Skip to main content

विकट वाट विकटगडाची

लेखक जगप्रवासी यांनी शुक्रवार, 16/10/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
आता कुठला गड करावा ह्यावर माझ आणि बायकोच खलबत चालू होत. बायकोने सहज विचारलं "माथेरान जवळच्या विकटगड करायचा का?" म्हटलं ठीक आहे बघूया झेपतो का, विकटगड करायचा म्हणून गुगल बाबाला म्हटलं जर माहिती द्या तर एक इमेज आली त्यात शिवशौर्य ट्रेकर्स १३ सप्टेंबर ला ह्या गडाच्या ट्रेकच आयोजन करताहेत असा कळाल.

हिशोब

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/10/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाणयाची मोठी चिंता होती मला.पैशासाठी काय पडेल ते करणं भागच होत त्यामुळं,त्यांचा तो प्रस्ताव मी ताबडतोप मान्य केला.आणि सरकारी दवाखान्याच्या व्हरांड्यात टाकलेल्या अमरला आणलं मी ऊचलून घरात.एड्स पेशंटला कोण थारा देणार? तो मी दिला.पैशाची चिंता करू नका ते बोलले,आणि 5000 रु.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ७ हिमालयाचा निरोप घेत ऋषीकेशकडे प्रस्थान

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 16/10/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

पहिल्या नजरेतलं प्रेम.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 16/10/2015 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यामुळे क्षणार्धात कुणाच्या तरी आपण प्रेमात पडावं,एखाद्याला ओळखत नसतानाही त्याच्या जवळ आपलं मन उघडं करून टाकावं, आणि आपली मनोभावना पाहून त्याने ती स्विकारावी वा स्विकारू नये,आपल्यात अश्या प्रकारची, प्रेमात पडण्याची क्षमता, असणं त्या क्षमतेला काय म्हणावं.?" सुशा,उषा आणि निशा अशा ह्या तीन बहीणी.प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा आणि विचार निरनीराळे.सुशा योग्य वयात लग्न करून संसाराला लागली. आपल्या संसारात ती सुखी होती.उषा तशी दिसायला चांगली.बॉलीवूडमधे नाचाच्या कोरसमधे मिळणार्‍या कामात समाधान रहायची.

झहीर खान निवृत्त!

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 16/10/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती. झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे.

आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 15/10/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
आरोग्यशास्त्रात सतत नवे शोध लागत असतात आणि त्यामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्‍या अनेक व्याधींवर नवनवीन उपाय निघाले आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पण हे सर्व कसे होते याबद्दल त्या क्षेत्रातले काही शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ सोडले तर इतर लोक अनभिज्ञ असतात. हे बरेचसे संशोधन रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये (अंडर लॅबोरेटरी कंडीशन्स) रुक्ष काटेकोर नियम पाळून केले जाते. मात्र हे सर्व करण्याअगोदर, करताना आणि ते करून मिळालेल्या निष्कर्षांचा अन्वयार्थ लावताना शात्रज्ञ आणि तंत्रज्ञ किती कल्पकता वापरतात याचा इतिहासही मनोरंजक असतो.

संध्याकाळचे विचार

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 15/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
( www.misalpav.com/node/30211 यावरुन सुचलेले काहीबाही) ............................................................................ काल संध्याकाळी मी ढाब्यावरचं होतो. खाऱ्या शेंगदाण्याची पुडी मीच फोडली. डाव्या बाजुला उकडलेल्या अंड्याच्या फोडी, टेबलावर गलास, बाटली, कांदा, शेवचिवडा बेत अगदी फक्कड जमला. सत्यानं बाटली फोडली. आणि गलास भरायला घेतले.

शेवयांचा तिखटमीठाचा शिरा

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 15/10/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
शेवयांचा उपमा मी पूर्वी एकदा दिला होता. आता हा शेवयांचा तिखटमीठाचा शिरा- साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा,१ लहान टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, ४-५ कढिलिंबाची पाने, १ मूठभर शेंगदाणे, मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर, फोडणीचे साहित्य, एक पळी तेल ओले खोबरे, कोथिंबिर, २ वाट्या गरम पाणी कृती- शेवया कोरड्याच तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. जर भाजलेल्या शेवया असतील तर किंचित भाजून घ्या. फोडणी करून त्यात कांदा व टोमॅटो घाला व परता. झाकण ठेवून शिजू द्या. भाजलेल्या शेवया घाला.

धरसोड

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/10/2015 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात. आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते. आजोबा आले की आई मला काम सांगणार. पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची. हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत. “आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं. “ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले. भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल. कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा. आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग? असंल कायतरी.