Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 26/09/2023 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या सर्व मित्रंना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती हे बुद्धीचे दैवत. याचा दैवताच्या क्षेत्रात होणाऱ्या एका क्रांतिकारक बदलाची आज आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. याबद्दल अनेकांनी याआधीही वाचन केले असेलच, याची मला खातरी आहे. पण तरीसुद्धा या नव्या क्षेत्राची अगदी बाळबोध ओळख करून द्यायचा माझा हा एक लंगडा प्रयत्न. २१वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे - म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स भविष्यामध्ये अनेक क्षेत्रे काबीज करू शकते.

श्रीगणेश लेखमाला २०२३ - पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 25/09/2023 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
पधारो म्हारे देश - ताल छापर अभयारण्य, राजस्थान भटकंती नवीन कॅमेरा आणि लेन्स घेतल्याने उत्साह एकदम दणदणीत होता, त्यामुळे कुठेतरी ट्रिपला जायचं आयोजन चाललं होतं. त्याच वेळेस एका मित्राने विचारलं की “आम्ही ताल छापर या ठिकाणी जाणार आहोत, तुला यायचंय का?” मग काय, बायकोची परवानगी घेतली, बायकोसुद्धा डीडीएलजेसारखं ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ या प्रकारे म्हणाली की “जा, जाऊन ये. त्या निमित्ताने नवीन कॅमेराही वापरता येईल.” तर अशा प्रकारे परवानगी मिळाली आणि मी तिकीट काढायला सुरुवात केली. पुण्यातून तिकीट खूप महाग होतं, म्हणून आम्ही मुंबईहून तिकीट काढलं - मुंबई ते जयपूर.

श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 25/09/2023 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे. _________________________________________________________ श्री गणेशोत्सवाचे दिवस . एकदम प्रसन्न वातावरण . ऑफिसातही थोडा निवांत वेळ . त्यामुळे मग दुपारी असे काहीही तरी स्वर्गीय वाचावयास मिळते . ऐतिहासिक कविता पाहता पाहता मोरोपंतांच्या १०८ रामायणांचा उल्लेख वाचायला मिळाला. अर्काईव्ह.ऑर्ग वर जरा शोधाशोध केली तेंव्हा मोरोपंतांच्या अफाट काव्याचा विस्तार दिसला !

एल-निनो : बिघडलेले आरोग्य आणि संभाव्य धोके

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 24/09/2023 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या जून महिन्यापासून एल-निनो या वातावरणीय बदलाचे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा तापमानवाढ होताना दिसते. अद्यापही एल-निनोचा हा प्रभाव टिकून आहे. वातावरणातील या महत्त्वाच्या बदलाचे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत आणि अजूनही होऊ शकतील. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांनी या संदर्भात एक विस्तृत अहवाल प्रकाशित केलेला आहे.

आर्थिक नियोजनामागील विचार!

लेखक राघव यांनी शनिवार, 23/09/2023 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे.

श्रीगणेश लेखमाला २०२३ - "मी धनंजय माने, आणि हा माझा बायको पार्वती"

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 23/09/2023 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या झोपलेल्या मराठी माणसाच्या कानावर जरी हे शब्द पडले तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्याचे भाव उमटतील आणि मनःचक्षूंसमोर 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटातील 'धनंजय माने' नामक भाडेकरू त्याची नवीन घरमालकीण 'लीलाबाई काळभोर' ह्यांना आपली बायको 'पार्वती' ची ओळख करून देतानाचा प्रसंग उभा राहील ह्यात तिळमात्र शंका नाही! २३ सप्टेंबर १९८८ रोजी प्रदर्शित झालेल्या आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले 'सोनेरी पान' असा लौकिक प्राप्त झालेलया 'अशी हि बनवा बनवी' ह्या चित्रपटाला आज दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

श्रीगणेश लेखमाला २०२३ - मखाना सुपरफूड

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 22/09/2023 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
मखाना सुपरफूड सध्या डाएट क्षेत्रात सुपरफूड म्हणून नावाजलेल्या बिया मखाना स्नॅक सुपरिचित आहेत. 1 वैज्ञानिक संज्ञा - मखाना ही एक जलीय वनस्पती आहे. मखानाला कमळबीज म्हटले जाते, ते चुकीचे आहे, त्या कमळाच्या बिया नव्हेत, तर युरेली फेरॉक्स (Euryle ferox) या दलदलीच्या पाण्यात वाढणाऱ्या लिलीच्या बिया आहेत. ‘फॉक्स नट’ हे त्याचे सर्वसाधारण नाव आहे.

अमेरिका 13 - फोबिया ते युफोरिया

लेखक निमी यांनी शुक्रवार, 22/09/2023 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर इमिग्रेशन काउंटरवर 'इंग्रजीचा फोबिया' मोफत मिळतो.. आणि आपण भारतीय 'मुफ्त' या शब्दाचे इतके भुकेले का असतो कळत नाही..पण नको असणाऱ्या मोफत वस्तूही आपण सहज गोळा करतो. 'लागेल कधीतरी!' 'देईन कोणालातरी!' ह्या आणि अशा विधानांचे पांघरूण घेऊन आपण असंख्य - अगम्य वस्तू केवळ मोफत मिळाल्याने, न नाकारता घरी आणतो. विमान प्रवासात दिलेले आणि न वापरलेले डिस्पोजेबल काटे - चमचे किंवा केक, बटर इत्यादी वस्तू सॅक मध्ये घेतलेल्याच असतात. काहीजण तर विमान प्रवासात थंडीसाठी किंवा झोपताना घेण्यासाठी दिलेली शाल निरोप समारंभात - सत्कारात मिळालेली शाल समजून घरीच घेऊन येतात.

हांगचौमध्ये आपलं स्वागत!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/09/2023 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
Team India हांगचौ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी रवाना झालेलं भारतीय क्रीडापटूंचं पहिलं पथक कोरोनामुळं एक वर्ष लांबणीवर पडलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत चीनमधल्या हांगझाऊमध्ये (चिनी भाषेतील उच्चार - हांगचौ) पार पडत आहेत.

श्रीगणेश लेखमाला २०२३ - माझा खत प्रकल्प

लेखक निमी यांनी गुरुवार, 21/09/2023 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझा खत प्रकल्प घरातील ओल्या कचऱ्याचं सुंदर गांडूळ खत होतं, हे मला माहीत असूनही त्याचा योग येत नव्हता. खत करण्यासंबंधी एक-दोन छोट्या पुस्तिका वाचनात आल्या होत्या. गांडूळ हा प्राणी तसा अगदी निरुपद्रवी, पण अतिउपयोगी. आवाज नाही, रडारड केकाटणं नाही, खाण्यापिण्याची तक्रार नाही, बाळंतपणसुद्धा अगदी बिनबोभाट. नर-मादी असा भेदभाव नाही. प्रजननाचा ठरावीक काळ नाही.. मादीला भुलवणं, इतर नरांशी स्पर्धा करत हिंसा करणं नाही. तसा अगदी सोपा, सुटसुटीत जीव. तरीही 'गांडूळ' म्हटलं की काहीतरी वळवळल्यासारखं वाटायचं आणि ते खत करणं लांबणीवर पडायचं.