Skip to main content

संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 23/11/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय.

अवधूत (भाग-५)

लेखक मांत्रिक यांनी सोमवार, 23/11/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अवधूत (भाग-५) थरथरत्या हाताने त्याने तो पेला घेतला. तापाने जिभेला चव काही कळतच नव्हती, पण तो उष्ण कढत द्रव पिल्यावर त्याला खरंच खूप बरं वाटलं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी बोलावं, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं. अचानक तेव्हाच कडाड् करुन एक वीज चमकली. खिडकीच्या गजातून तिचा प्रकाश आत आला असेल-नसेल त्या क्षणार्धात तिचा चेहेरा उजळून निघाला. क्षणभर त्याला असा भास झाला की त्या चेहे-याच्या जागी काहीच नव्हतं. पण क्षणभरच! पुन्हा तिचा खानदानी, आदबशीर तरीही अनामिक दुःखांनी भरलेला चेहरा त्या जागी दृग्गोचर झाला. ***** आपण पाहिलं तो केवळ भास असावा, विजेच्या प्रकाशाने केलेला एक खेळ!

आला आला जिलबीवाला

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 23/11/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले
काव्यरस