Skip to main content

मंटू, ॲलेक्सा आणि गाणी

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 14/10/2023 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट फोफावण्याच्या आधी म्हणजे अगदी १० वर्षांच्या पाठीमागे गाणी नियमितपणे ऐकायचो. नियमितपणे म्हणजे दिवसातले चार पाच तास वगैरे. त्याच्याही आधी जेव्हा टीव्ही बोकाळायचा होता, तेव्हा घरी रेडिओ आणि टेपरेकॉर्डर दिवसाचे आठ-दहा तास व्यापून असायचा. टीव्हीवरच्या कार्यक्रमांसाठी ठराविक काळ राखून ठेवलेला असायचा. इतर वेळी रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर सतत चालू. रेडिओवरही फक्त विविधभारती. टेपरेकॉर्डरच्या कॅसेट्ससाठी कपाटाचा एक मोठा कप्पा होता. सर्वात वरती, काचेचा. तीन-चार ओळीत त्या सर्व कॅसेटी ठेवलेल्या असायच्या. त्यात पुन्हा, भक्तीसंगीत, मराठी, हिंदी चित्रपट गाणी अशी वर्गवारी असायची.

आमच्या छकुलीची मराठी अस्मिता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 14/10/2023 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला वाटते तसे लहान पोरं ही निष्पाप असतात ही भारी गैर समजूत आहे. जन्माच्या पहिली दिवसापासून ते आपला स्वार्थ सिद्ध करण्याची राजनीती शिकू लागतात. जशी निवडणूक जवळ येते मुंबईत अनेक नेत्यांची मराठी अस्मिता जागृत होते. तसेच आमच्या छकुलीची ही मराठी अस्मिता अचानक जागृत झाली. असाच एक किस्सा. छकुलीचा लहान भाऊ तेजस ( बदलेले नाव) तिला बडी दीदी म्हणतो. त्याच्यापेक्षा सहा महिने मोठ्या चुलत बहीणीला तो छोटी दीदी म्हणतो. तिन्ही मुले मला आबा आणि सौ.ला आजी म्हणतात छकुलीने कारोना काळातील दोन वर्ष अर्थात केजी आणि पहिलीचा ऑनलाईन अभ्यास आमच्या घरी केला. दोन वर्षांत ती मराठी उत्तम बोलू लागली होती.

देखणं चेन्नई सेंट्रल

लेखक पराग१२२६३ यांनी शुक्रवार, 13/10/2023 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 13/10/2023 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो.

मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 13/10/2023 06:33 या दिवशी प्रकाशित केले.

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

राम राम, मिपाकर. श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 12/10/2023 17:13 या दिवशी प्रकाशित केले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

प्रारब्ध

लेखक साहना यांनी गुरुवार, 12/10/2023 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
आर्यावर्तात कुणा एके काळी एक गरीब शेतकरी होता. त्याची एक सर्वसाधारण मुलगी होती. आई लहानपणातच मेली आणि गावांत साथ येऊन असंख्य लोक मेले आणि शेतकऱ्याला आपल्या पोरीला घेऊन गांव सोडावा लागला. बरोबर एक बैल आणि मोजकेच सामान घेऊन बाप लेक लाचारीने आणि भुकेने सर्वत्र फिरत होते. मुलगी लग्नाची झाली होती, वयात आली होती त्यामुळे तिचे शिलरक्षण हि सुद्धा चिंता होतीच. अश्यांतच बापाला ताप आला. आपण आणखीन जास्त दिवस जगणार नाही हि जाणीव झाली. मुलीचे काय होईल ह्या चिंतेने त्या बापाची घालमेल आणखी वाढली.

शुक्राची चांदणी

लेखक चक्कर_बंडा यांनी बुधवार, 11/10/2023 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/10/2023 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो. ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले... तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे...