Skip to main content

विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि...

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 02/01/2024 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
(काही सत्य काही कल्पना) रात्रीचे स्वप्न: ११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले.

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग २

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 02/01/2024 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ येथे वाचा सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1 आज थोडी उशिराच जाग आली. सूर्य उगवला नसला तरी चांगलाच उजेड झाला होता. ब्रश केला, तोंड वगैरे धुतले. बाकी प्रातःर्विधीसाठी शौचालय वगैरे काही नाही. पाण्याची बाटली भरून माळरानावरच झुडुपांच्या जाळीत जायचे. सर्व आटोपून चहा घेतला आणि कोकण कडा पाहण्यासाठी निघालो. कडा अगदी बाजूलाच आहे.

व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 01/01/2024 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
*व्हाॅट्सअपवरची माणसं - व्हर्जन २०२४* *कट्टर भाजप समर्थक* : यांना देशातल्या प्रत्येक राज्यातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक गावातला प्रत्येक ग्रामसेवक हा सुद्धा भाजपचाच हवा असतो. त्यामुळे सतत मोदी किंवा भाजप , राममंदिर यांच्या पोस्टचा तुफानी मारा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्यासारखे पोस्टत राहतात. समजा एखाद्या समूहात सगळे भाजप समर्थक आहेत हे माहिती असले तरीसुद्धा ; समजा जर आपण हा मारा थांबवला आणि चुकून त्यातला एखादा भाजपपासून थोडासा लांब गेला ; त्याची विचारसरणी ही भाजपला प्रतिकूल अशी बनली तर काय करायचं ?

आवळी-जावळी, ‘आवळी-आवळी',.. इत्यादी !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 01/01/2024 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
२०२४ : आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक आरोग्यपूर्ण शुभेच्छा !. ********************************* गेल्या पंधरवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या.

अभंग

लेखक बाजीगर यांनी रविवार, 31/12/2023 00:42 या दिवशी प्रकाशित केले.

म्युच्युअल फंड गुंतवणूक: माझा अनुभव

लेखक ईंद्रधनु यांनी शुक्रवार, 29/12/2023 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्युच्युअल फंड या विषयावर सोशल मिडिया आणि युट्युब यावर खूप माहिती मिळत असते. काहींच्या मते हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे तर काही याला खूप नावं ठेवतात आणि स्वतः शेअर मार्केट मध्ये गुंतवुन त्यात जास्त फायदा कसा आहे ते सांगतात. या सर्व मत-मतान्तरात मी माझा अनुभव सांगतो. मी सुमारे ५ वर्षांपूर्वी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला सुरुवात केली. अर्थात ५ वर्ष हा काही इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीच्या दृष्टीने फार मोठा कालावधी नाही.

राजमा गस्सी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 28/12/2023 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
गस्सी गुगलला विचारले असता त्याने गस्सी म्हणजे "थिक करी" असं सांगितलं आहे :) तर दक्षिण भारतात इडली, डोशासाठी वापरल्या जाणाऱ्या पोडीची तर मी फॅन झालेच आहे. अगदी डबा भरून ठेवते, लेकीला भातावर कधी चटणी तेल म्हणूनही आवडते. यात डाळी वापरल्या जातात, हे आवडतं. त्याचाच एक पुढचा पदार्थ समजला, गस्सी भाजी. यात मसाला ताजा बनवून वापरल्या गेल्याने चविष्ट पदार्थ होतो. मी राजमा वापरला.