Skip to main content

राणीच्या देशात - ब्राँटे पार्सोनेज (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 19/04/2016 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
Header आवडत्या लेखिकेच्या निवासस्थानाला दिलेल्या भेटीबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल मिळालेली माहिती याबाबत पुस्तकदिनानिमित्त आवर्जून लिहावेसे वाटले म्हणून हा लेख. मला हॅवर्थला जायचे आहे असे मी मागे नवऱ्याला तीन-चार वेळा सांगितले होते पण काही केल्या जाणे होईना. यावर्षी हॅवर्थ बघायचेच आहे असा हट्ट केला तेव्हा त्याने विचारले हॅवर्थला आहे तरी काय?

कविता ......!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 19/04/2016 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
कविता ...... तुमच्या भावना अन कैक स्वप्ने तुमचे मोठेपण कि एकट्याने जीणे , ती सग्गळ कोरून घेते आणि तशीच बहरते ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … तुम्ही म्हणाल तेव्हाच जन्मते तुमच्या हाताने पूर्णविरामाबरोबर संपते शेवटच्या ओळीने , कधी प्रशंसा कधी टाळी तुम्ही घेता तिच्यासाठी कधी उसासा तर कधी विडंबन ती झेलेते तुमच्यासाठी ! पण तिच्यासाठी कधी कुणी झुरत नाही अन कवितेचे मन, कधी कुणा कळत नाही … … तिचा प्रवास तीच करते कधी शब्दांमधून कधी भावनांमधून नाहीतर अस्फुट अशा स्वल्पविरामांमधून , तिचे नशीब तुम्ही घडवता आणि तुमचे ती , पण कविता

मोसाद - भाग ११

लेखक बोका-ए-आझम यांनी मंगळवार, 19/04/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग १० मोसाद - भाग ११ १ एप्रिल १९७३, बैरुट, लेबेनॉन. सँड्स हे बैरुटमधल्या प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक. त्या दिवशी सकाळी तिथे नेहमीची लगबग चालू होती, त्यामुळे बेल्जियन पासपोर्ट घेऊन आलेल्या गिल्बर्ट रीम्बो नावाच्या पर्यटकाकडे कुणाचंही जरुरीपेक्षा जास्त लक्ष गेलं नाही. त्याच दिवशी दुपारी डीटर ऑल्टन्यूडर नावाचा जर्मन पर्यटक तिथे आला.

मैथिली

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/04/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं. हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं. " हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच. "कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय? तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली.

लहान मुलांचा मित्र "बबल्स" (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक मालविका यांनी सोमवार, 18/04/2016 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
Header लहान मुलांचा मित्र "बबल्स "(वय वर्षे २ते ५ ) माझा मुलगा दोन वर्षाचा झाला तेव्हा आमची भारत वारी झाली . माझ्या तिथल्या एका स्थानिक मैत्रिणीने तिच्याकडील २ पुस्तके मला दिली होती. त्याचे पूर्ण १२ भाग आहेत असे सांगितले होते. तिच्याकडे २ च होते. भारतात मिळतील असेही सांगितले. तेव्हा मी राहत असलेल्या देशात इंग्रजी पुस्तके तुलनेने खूप म्हणजे खूपच कमी मिळत. दुसऱ्याने वापरलेली पुढे पास होत असत.

वाचू आनंदे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक मितान यांनी सोमवार, 18/04/2016 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
Header मित्रमंडळींच्या घोळक्यात एक दिवस असे लक्षात आले की खूप जण पुस्तकावर प्रेम करणारे आहेत. वाचतात. जमेल तशी पुस्तक खरेदी करतात. खूप जणांना स्वतःची पुस्तकं असावी असे वाटते. पण पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर एकदम खूप सारी पुस्तकं खरेदी करायला मध्यमवर्गीय खिसा नको म्हणायचा. वाचनाची ओढ तर स्वस्थ बसू देत नाही. घरात हवे ते पुस्तक हवे तेव्हा हाताशी असणे हे सूख पण वेगळेच !

पाडस (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 18/04/2016 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
Header पाडस- राम पटवर्धन यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या द येर्लिंग चा केलेला हा नितांतसुंदर अनुवाद! अत्यंत समर्थ अनुवादांपैकी एक! आपल्याला आवडत्या पुस्तकातला आवडलेला परिच्छेद निवडायचा ठरवल्यावर नक्की कोणते वेचे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे ठरवता येणं फार कठिण झालं.

ओऱ्हान पामूकचं इस्तंबूल (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक विशाखा पाटील यांनी सोमवार, 18/04/2016 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header एकेकाळी वैभव उपभोगलेल्या, पण आता केवळ त्याच्या खुणा मिरवणाऱ्या एखाद्या गावात जावं. संध्याकाळची कातर वेळ असावी. त्या वातावरणात आपलं मनही नकळत भूतकाळात शिरतं. काळ निसटून चालल्याची हुरहूर मनाला लागते. उदासवाणी छटा आसमंतापासून मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत व्यापून राहते. मृत्यूचं वाटतं तसं ते भीतीदायक दु:ख नसतं, तर भावव्याकूळ होणं असतं. ती व्याकुळता जीवनाच्या क्षणभंगुरतेसाठी असते.

मुलाखत - श्री. विवेक मेहेत्रे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 18/04/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
Header नमस्कार मंडळी, पुस्तक दिन विशेष लेखमालिकेच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलेले आहेत प्रसिद्ध हास्यचित्रकार 'श्री. विवेक मेहेत्रे'. व्यंगचित्रकार म्हणून आपण विवेक मेहेत्रे यांना ओळखातोच. अभियांत्रिकी शाखेतून उच्चशिक्षण घेतल्यावर श्री. विवेक मेहेत्रे यांनी लेखन, कविता, व्यंगचित्रे, एकपात्री प्रयोग, संपादक, प्रकाशक, व्याख्याता अशी अनेक क्षेत्रात यशस्वी वाटचाल केलेली आहे.

खुणावणारं खुलं वाचनालय (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक शिल्पा गडमडे यांनी सोमवार, 18/04/2016 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
Header काही दिवसांपूर्वी ऑनलाइन काहीतरी वाचत असताना मला अचानक ‘बालभारतीचे’ पुस्तक गवसले. ते पुस्तक चाळताना मन थेट जाऊन पोहचलं ते शाळेत. बालभारतीचे धडे वाचताना अनेक लेखकांची ओळख झाली, अधिकाधिक वाचायची गोडी निर्माण झाली. या आवडीतून माझी ओळख झाली लायब्ररी म्हणजेच वाचनालयाशी. कितीतरी विषयांवरची हजारो, लाखो पुस्तकं वाचनालयात आपली वाट बघत सज्ज असतात.