Skip to main content

प्रकाशन व्यवसाय - व्यवसायातील तंत्र आणि मंत्र (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक भुमी यांनी बुधवार, 20/04/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
Header  सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा! पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे.

सायकलीशी जडले नाते २७: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची झलक. .

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/04/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

बागेसंदर्भात सल्ला हवा आहे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 20/04/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल. बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे.

पुस्तकांचे देणे (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक मनिष यांनी बुधवार, 20/04/2016 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
Header खूप लहानपणी जळगावला राहत असतांना घराजवळ, मोरॅको रेस्टॉरंटजवळ समोरासमोर दोन पेपरचे स्टॉल होते आणि तिथे बरीच गोष्टींची पुस्तकंही मिळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-बाबांना पटवून कित्येक पुस्तकं विकत घ्यायचो आणि घरात किंवा बाहेर बागेत वाचत असायचो तासंन-तास! अगदी काल-परवापर्यंत त्यातील 'जांभळ्या दाताची राजकन्या' होतं माझ्याकडे, मग कुठे गेलं काय माहित! असो!

THRILL…..Once Again

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 20/04/2016 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
THRILL…..Once Again ****************************************************************************** वाचकांसाठी एक नम्र विनंती. ह्या कथेतील संदर्भ सम्जुन घेण्यासाठी तुम्हाला अगोदर माझी "Thrill" हि कथा वाचावी लागेल. http://www.misalpav.com/node/30565 ****************************************************************************** कधी कधी काही काही गोष्टी प्रारब्धातच लिहिलेल्या असतात. अगदी ठरवुनही टाळता येत नाहीत अश्या काही. अशीच एक गोष्ट माझीही आहे. मला आजही आठवतय त्यादिवशी शुक्रवार होता. संध्याकाळी अंड्याचा फोन आ्लेला.

अॅगाथा क्रिस्ती (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक जुइ यांनी बुधवार, 20/04/2016 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
Header मर्डर इज अनाउन्सड!! शsssssssss खून झाला आहे! "A Murder is announced" मर्डर मिस्टरीज वाचणार्‍यांसाठी परिचित असे हे वाक्य आणि कादंबरी देखील. या कादंबरीची लेखिका आहे Queen of crime म्हणून नावाजलेली अ‍ॅगाथा क्रिस्ती. १५ सप्टेंबर १८९० साली Agatha Mary Clarissa Miller चा जन्म अमेरिकन वडील आणि ब्रिटिश आईच्या पोटी Torquay इंग्लंड येथे झाला.

पुस्तकांची काळजी कशी घ्यावी? (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

लेखक अनाहिता यांनी मंगळवार, 19/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
Header
  • पुस्तकं स्वच्छ हातांनी हाताळावीत.
  • शक्यतो पुस्तक वाचातांना / हाताळतांना खाण्यापिण्याचे पदार्थ दूर ठेवावेत.
  • खुणेसाठी पानं कोपर्‍यात दुमडण्याऐवजी पुस्तकखुणा (बुकमार्क्स) वापरावेत.
  • नविन पुस्तक घेतल्यावर प्लॅस्टीक अथवा कागदी कव्हर घालावं.
  • पुस्तकांचं कपाटं सूर्यप्रकाश थेट पुस्तकांवर पडेल अशा ठिकाणी नसावं.
  • पुस्तकं अधून मधून हाताळत रहावी.

दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 19/04/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे. तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ.

पु . ल . तुमच्यासाठी!

लेखक उल्का यांनी मंगळवार, 19/04/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे लाडके दैवत मनापासुनी हा केला गौरव ‘आपुलकी’ ही साऱ्यांची उदंड केले प्रेम तुम्हावरी ‘पुरचुंडी’ ही तुम्ही बांधली ‘खिल्ली’ कोटयानी उडवली ‘पूर्वरंग’ हा तुम्ही सजवला ‘वंग-चित्रे’ ना साज चढवला ‘जावे त्यांच्या देशा’ जेव्हा ‘गणगोत’ सारे जमते तेव्हा ‘बटाटयाची चाळ’ असो वा ‘वाऱ्यावरची वरात’ असो भेटले ‘व्यक्ती आणि वल्ली’ ‘हसवणूक’ ही झाली न्यारी आम्हास वाटे ‘अपूर्वाई’ फळास आली आमुची पुण्याई शब्दरूपी हा खजिना तुमचा भाग्य आमुचे आम्हा लाभला अनंत या हो उपकारांची होऊ कशी मी उतराई ऋणात राहुनी तुमच्या मी सदैव ‘गुण गाईन आवडी’ – उल्का कडले (ही कविता मी एक-दीड वर्षापूर्वी केली होती. खास पु.

स्फुटः संन्यास...

लेखक राघव यांनी मंगळवार, 19/04/2016 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गृहितक: या विषयावर विचार करतांना भगवंत आहे, सर्व चराचरांत व्याप्त आहे, आणि मनापासून ईच्छा असल्यास साधनमार्गावर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकतो.. हे मी गृहित धरलेलं आहे. बर्‍याच दिवसांपासून यावर विचार करतोय, संन्यास म्हणजे काय? तो कशाकरिता घेतात? ज्या ध्येयासाठी घेतात ते संन्यास घेतल्याविना साध्य होणार नाही काय? पण उत्तरांनी समाधान काही होत नाही. प्रत्यक्ष तेवढा प्रखर अनुभव घेतल्याशिवाय समजणारही नाही बहुदा. तरीही मला जे वाटतं ते मांडतो. संन्यस्त होणं म्हणजे सरळ अर्थ काढला तर निवृत्त होणं. कशापासून निवृत्त व्हायचं? जगापासून. का निवृत्त व्हायचं?