Skip to main content

कोचिंग उद्योग नियमावली

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 24/01/2024 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्र शासनाने नुकतेच कोचिंग उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली प्रकाशीत केली. शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय असल्याने त्याचे अंतिम स्वरूप देण्याचे काम राज्यांवर सोडले आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार. १) मी सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली. त्या आधी १२वीच्या बोर्डाच्या मार्कांवर प्रवेश होत असत.

पंजाबी पिन्नी करंजी

लेखक Bhakti यांनी बुधवार, 24/01/2024 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
क थंडीचे छान गार गुलाबी दिवस आहेत.पोटातला अग्नी खारीक-खोबर्याने तृप्त होतो.ऊबदार होतो.पण माझी लेक खारीक खोबरं लाडूंना तोंड लावेल तर शपथ!मग आईने त्यात एक वाटी गव्हाचे पीठ भाजून टाकले (अशा लाडूंना पंजाबी पिन्नी म्हणतात हे मी #Mumbai Swayampakghar च्या एका पोस्टमध्ये वाचलं होतं).तरीही खाईना.लहान मुला

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 22/01/2024 23:59 या दिवशी प्रकाशित केले.

संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो...

भाग २ व ३

लेखक म्हया बिलंदर यांनी सोमवार, 22/01/2024 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

आईच्या गावात ...... चांगले बोल

लेखक विअर्ड विक्स यांनी सोमवार, 22/01/2024 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
हा आठवडा मराठी चित्रपटासाठी सुखद धक्का होता . एकाच आठवड्यात तीन नवीन चित्रपट भेटीस येणार होते . श्यामच्या आईच्या धक्क्यातून अजून सावरलो नसल्याने डोक्याची मंडई न करणारा चित्रपट पाहायचा असे ठरवले होते. पण यावेळेस त्रिधा मनस्थिती झाली होती. 'पंचक' , 'ओले आले' आणि 'आईच्या गावात मराठी बोल' असे तिन्ही विनोदी धाटणीचे पण वेगळ्या अंगाचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. (महत्प्रयत्नाने release चा मराठी शब्द गुगल न करता आठवला. काय दिवस आलेत मराठीतले शब्द सुद्धा गूगलवर शोधतोय !!) पंचक माधुरी दीक्षितचा चित्रपट असला , तरी ती यात नव्हती.

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १ (जनकपुर)

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 19/01/2024 23:44 या दिवशी प्रकाशित केले.

अधिक श्रावण मास संपायला ८-९ दिवस शिल्लक राहिले असताना वडिलांनी निज श्रावणी सोमवारी पशुपतिनाथाचे दर्शन घेण्याची इच्छा आपल्या 'रावण' बाळाकडे व्यक्त केली. त्रेतायुगातील 'श्रावण बाळाला' आपल्या माता-पित्यांची तीर्थयात्रेची इछा पूर्ण करण्यासाठी कावड खांद्यावर घ्यावी लागली होती, पण कलियुगातील ह्या रावण बाळाला प्रवासासाठीचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने तेवढे कष्ट घेण्याची गरज नसल्याने त्याने त्वरित होकार भरला आणि त्यादृष्टीने तयारी सुरु केली.

कोपनहेगन - पॅरिस भटकंती -१

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 18/01/2024 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November” बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला.

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

लेखक रम्या यांनी बुधवार, 17/01/2024 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?