पोश्टरबॉइज -२
जेवणंखाणं उरकून २ तास झाले. प्रेस बंद करायची वेळ आली तरी नेत्यांचा पत्ता नाही. कार्यकर्त्यांचे फोनवर फोन चालू होते. कंटाळून आता उरलेल्या कामाला उद्या या असे सांगून पीसी बंद केला आणि निघालो. दरवाजातच स्कॉर्पिओला अडलो. पांढर्या लिननच्या ताग्यात गुंडाळलेले आणि सोन्याने मढलेले एक वजनदार प्रकरण बॅकसीटवरुन उतरत होते. पांढर्याच लेदरच्या चपला आणि हातातले राडो. जडावलेले डोळे आणी इंग्लिश प्लस सेंटचा उग्र वास. गप्प गाडी परत लावली आणि येऊन पीसी चालू केला. झालेल्या कामाचा आढावा सरलोकांनी नेहमीच्या सफाइने दिला.
"हे बग, नाळ मुंजाळे येयाचं जल्दी. नाईटला पोस्टर पायजे.
मिसळपाव