Skip to main content

तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

लेखक महामाया यांनी सोमवार, 30/05/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
तलत महमूद ची आठवण.... ‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं... कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’ तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला.

सर्वेक्षणातून काय दिसलं : पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 30/05/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वेक्षण माहितीपर लेख काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ही बंदी लागू होण्याआधीच, निर्णय घेतल्यावर काही दिवसांत तो मागेही घेतला. त्या निमित्ताने पॉर्न म्हणजे नक्की काय, ते कशासाठी, ते चांगलं आहे का वाईट, याबद्दल सोशल मिडियामध्ये चर्चा झालेली दिसली. अनेक मुद्द्यांप्रमाणे या प्रश्नाबद्दलही काळं किंवा पांढरं अशीच भूमिका घेतलेली दिसली. पॉर्न विरोधकांची भूमिका साधारणतः पॉर्नमुळे वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रचंड हानी होते अशी भूमिका.

राजमाची : उन सावल्यांचा खेळ आणि काजवे

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी सोमवार, 30/05/2016 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
नेट वरती राजमाची वरील काजव्यांचे फोटो बघून डोळ्यापुढे काजवेच चमकले. म्हणून कालच (२९ मे ) ला राजमाची ला जायचा प्लान तयार केला. नेट वरून कळाले कि, मुंबई ट्रेकरचा पण एक ग्रुप २९ मे लाच येणार होता. त्यामुळे या दिवशी काजवे दिसणार अशी आशा बळावली. कारण हे लोक अभ्यास आणि माहिती गोळा करूनच येत असतात. तसेच गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. पाऊन पडण्याची शक्यता होती. असे वातावरण काजवे दिसण्यासाठी आदर्श असते. पुण्याहून दुपारी ३ ला निघालो. ४ पर्यंत लोणावळ्याला पोहोचलो. तिथे एकाला विचारले कि, राजमाचीला रस्ता कुठून जातो. तर त्याने सांगितले कि, तुम्ही तुंगार्ली वरून जाऊ नका. रस्ता खूप खराब आहे.

घर क्रमांक – १३/८ भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 30/05/2016 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
घर क्रमांक – १३/८ माझा एक मित्र परवाच मला भेटला आणि म्हणाला, ‘‘तुला एक गंमत सांगतो. आम्ही मधे एक झपाटलेले घर पाहिले. इथे पुण्यात !’’ तो माझी चेष्टा करतोय का खरंच सांगतोय हे माझ्या लक्षात येईना. माझा हा मित्र बऱ्यापैकी नावाजलेला शास्त्रज्ञ आहे. मी त्याला डॉ. म्हणूनच हाका मारतो. ‘‘काय म्हणालास ? झपाटलेले ? कोणी भुताने का ? ’’ मी त्याला विचारले. ‘‘हंऽऽऽ मी ते सांगू शकणार नाही. मी फक्त तुला काय झाले ते सांगू शकतो.’’ ‘‘ मागच्या महिन्यात मी व माझी बायको नवीन घराच्या शोधात होतो. अर्थात भाड्याच्या. आम्हाला फर्निचर असलेले घर पाहिजे होते.

जगाचं असंच असतं!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 30/05/2016 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!) जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.

वेष्टणावरील छापील किंमत - एक साळसूद फसवणूक !?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 30/05/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
MRP उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

"व्वा…क्या बात है…!"

लेखक अश्विनी वैद्य यांनी सोमवार, 30/05/2016 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
"व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर, त्या सुरांवर, त्या मधुर आवाजावर, त्या अभिनयावर एकूणच त्या साऱ्या बेभान कलाकृतीवर, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर भान हरपून स्वत्वही हळुवार निसटावं अगदी स्वतःच्याही नकळत, पार आत खोलवर कुठेतरी काहीतरी कधीतरी असं भिडावं नसलेल्यातलं असणं डोळ्यासमोर उभं राहावं, असलेल्याच्याही नकळत, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर बंद डोळ्यांच्या पडद्याआड सगळे संदर्भ, स्पष्टीकरणासहित लागावेत, संवेदनशीलतेच्या परिसीमा तिची हद्द ओलांडून जाव्यात, पंचेंद्रियांच्या जाणीवा तृप्ततेच्य
काव्यरस

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 30/05/2016 02:08 या दिवशी प्रकाशित केले.

हरवले ते गवसले का? कसे? ८ लक्षाधीशाचा झाला भिक्षाधीश भाग २

पैसे परत मिळाले की नाही? ते कोणी लाटले?

... आता माझ्यातला कमांडर जागा झाला. कार्डासोबत मिळालेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे धडाधड फोन लावले. कार्ड ब्लॉक केले! त्यात सांगितलेल्या प्रमाणे कार्डाचे २ तुकडे करून फोटो पाठवले. कार्ड माझ्या खिशात असताना पैसे खटाखट गेले कसे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नव्हते! तोवर भाच्याला कल्पना दिली. आम्हाला दुसर्‍या दिवशी सकाळीच ७ दिवसाच्या सहलीला जायचे कॅन्सल न करता त्याला डॉलर्सची व्यवस्था करून पैसे आणायला विनंती केली.

पावसामधल भंकस इंद्रधनुष्य

लेखक सुशेगाद यांनी सोमवार, 30/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस पडत नसताना किंवा पाउस पडून गेल्यावर जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल त्याच्या मधल्या कालावधीत सिटी बसने मी प्रवास करत असतो खिडकीतून बाहेर पाहत राहतो बाहेर ओली झालेली जमीन झाडांवरून ठिबकणार पाणी त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला श्रन्धाजली देणारी ग्राफिटी कुठल्यातरी stop वर बस चे automatic दरवाजे उघडतात ती बस मध्ये येते अप्रोन घालून माझ्या बाजूला बसते आम्ही एकमेकांना नाव न विचारता बोलायला सुरु करतो मानसाच डिसेक्शन करताना कस वाटत यावर बोलतो ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा आतडी , फुफ्फुस आणखी

निशाण

लेखक म्हसोबा यांनी रविवार, 29/05/2016 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
तू मला हसायला शिकवलंस कधी धड रडलोही नव्हतो त्या आधी मी तू मला उभं राहायला शिकवलंस कधी धड पडलोही नव्हतो त्या आधी मी आठवांचा पूर येतो कधी या एव्हढ्याशा दोन डोळ्यात माझ्या कधी वाटते लोटली युगे आता कधी वाटतात त्याच आठवणी ताज्या तुझा हात सुटला तो क्षण कोरला आहे मनावर लेण्यातील शिलालेखासारखा त्याचीही पडझड होईल कधीतरी याच आशेवर जगतोय आता मी चातकासारखा मिटून जातील मग निशाण सारे तू तर नाहीसच आता इथे, मी ही नसेन तेव्हा काय होईल याची आता क्षिती कशाला काळ आपल्या फटकार्‍याने सारे मिटेन हे जेव्हा