Skip to main content

माझा sky diving चा अनुभव

लेखक Jack_Bauer यांनी शनिवार, 25/06/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी मिलेगी ना दोबारा हा चित्रपट मी २०११ मध्ये पहिला आणि तेव्हापासून sky diving करायची इच्छा मनात होती. माझ्या पत्नीला ही इच्छा बोलून दाखवल्यावर ती पण यायला तयार झाली आणि हा योग मागच्या आठवड्यात आला. ह्यासाठी थोडी तयारी करावी लागली आणि हे सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहे जेणेकरून ज्यांना हा अनुभव घायची इच्छा आहे त्यांना मदत होईल आणि ह्याच बरोबर जाणकार ह्या माहितीत त्यांची भर घालतील. हे लेख म्हणजे आमचा अनुभव + टिप्स असा आहे. पूर्वतयारी : ------------ आमची ही पहिलीच वेळ असल्याने मला Tandem जम्प हाच पर्याय होता.

शेवटी बाप हाय म्या-3

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 25/06/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली. तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु. मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग- 14

लेखक मेघना मन्दार यांनी शुक्रवार, 24/06/2016 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
भाग चौदावा - आज मी जाणार होते कॅमडन मार्केट आणि रॉयल एअरफोर्स म्युझिअम पाहायला. कॅमडन मार्केट इथे जाण्यसाठी कॅमडेन टाऊन नावाचे ट्युब स्टेशन आहे. या स्टेशन मधून बाहेर पडलो की १० मिनिटे चालत जायला लागतं. स्टेशन मधून बाहेर पडल्या पडल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानाच्या रांगा सुरु होतात. थोडं पुढे गेल्यावर ची कॅमडन मार्केट मोठी भिंत आणि कॅमडन लॉक दिसते तिथून आत जायचे. हे एक स्ट्रीट मार्केट आहे. खरेदी करण्यासाठी पण तसं स्वस्त आहे. इथे कपडे, शूज , वेगवेळ्या अक्सेसरीज, आणि बरंच काय काय मिळतं. स्वस्त जरी असलं तरी चीप नाही वाटलं मला. लोकं इथे जात असतील ते म्हणजे खाण्यासाठी.

अश्याच एका पावसाळ्या रात्री .........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 24/06/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अश्याच एका पावसाळ्या रात्री, जेव्हा ती मला भेटली होती लखलखत्या काळोखात, तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती एकुलत्या एका शेडखाली मला खेटुन ती उभी होती अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने तिची ओली काया शहारत होती बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र, एकसारखा कधीचा कोसळत होता मला वाटलं की तोही तिच्यासाठीच आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता वाटलं की तिला कवेत घेउन ह्या पावसात चिंब भिजावं मिठीत तिच्या विरघळून जावं अन स्वता:लाही विसरावं ढगांच्या गडगडाटांनी घाबरून ती अशी काही मला बिलगावी की, हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही, पाहून त्या पावसाचीही जिरावी पाउस ही आता जरा जास्तच इरेला पेटला होता वाऱ्य

तुझ्या नकळत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 24/06/2016 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नकळत तुला, रतीने बघावे अन पाहून तव रूप ,लज्जित व्हावे . असा ,सखे लयबद्ध पदन्यास तुझा पैंजणास वाटे, तुज बिलगुनि राहावे . अशी लाजरी अबोध रमणी, असे तू आला वसंत देही,तुज ठाऊक नसावे. . नाभीत जशी त्याच्या ,कस्तुरी दरवळे तसे मम हृदयी तू ,दरवळत राहावे . हे काय झाले,तुला हि कळेना ते पाहून ,मदनाने गाली हसावे . तारकांच्या साक्षीने विवाहबद्ध व्हावे मी तुला अन तू सौभाग्यास मिरवावे

पाऊस असा...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 24/06/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी... पाऊस थोडा सुस्तावलाय आता. म्हणून तर पागोळीचं ठिबकणं इतकं छान स्पष्ट ऐकू येतंय...

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 24/06/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

बँकॉक: धावती भेट: ३. जलयात्रा

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 24/06/2016 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग , एखाद्या ठिकाणी -मग ते अगदी आपल्या देशात का असेना – एक दोन दिवस फिरायचं तर फारसं काही कळत नाही. दिसतात अनेक गोष्टी, पण त्यांचा अर्थ कसा लावायचा ते समजत नाही. गोंधळ वाढतो. बँकॉकमध्ये एक दिवस भटकल्यावर मी काहीशी गोंधळले होते. सभोवताली सगळं शिस्तीत आणि शांततेत चाललं होतं. मॉल्समधल्या गर्दीत अनेक स्थानिक लोकही दिसत होते. रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांतही भरपूर गर्दी होती. स्काय ट्रेनमध्ये गर्दी असूनही धक्काबुक्की नव्हती.

६३ गुणांचा योग +योग

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 23/06/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
याला योगायोगच म्हणातात ना! नमोजी प्रधान सेवक झाले आणि संपूर्ण जगाने २१ जून रोजी योग दिवस साजरा केला. नमोजींची छाती ५६ इंचां पासून ७२ इंचाची झाली असेल. कदाचित् या पेक्षा जास्ती हि. पण गेल्या ३० वर्षात अस्मादिकांचा छातीचा घेर कमी होत गेला आणि पोटाचा वाढत गेला. नमो सारखे योग करणे अस्मादिकांना तरी शक्य होणार नाही. योग म्हणजे जमा, जोड किंवा अंकांचा खेळ, काही हि म्हणा. असाच एक योगा + योग माझ्या आयष्यात ३० वर्षांपूर्वी आला. ३६ गुणांच्या जाळयात न कळत अडकलो. काय करणार, जूनचा महिना होता बाहेर चक्क ४५% तापलेले होते. अंगाची भयंकर लाही लाही होत होती.

तंबाखू व सिगरेटचा विळखा कसा सोडवावा??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 23/06/2016 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी अकरावीत असताना पहिल्यांदा सिगरेट ओढली,तेव्हा काही कीक वगैरे बसली नाही,मित्रांच्या आग्र्हाखातर मी पहील्यांदा सिगरेट ओढली होती,पुढे सिनिअर कॉलेजला गेल्यावर आठवड्यातून एकदा दोनदा सिगरेट ओढायचो, मग त्या सिगरेटची कीक बसायला लागली व ती हविहविशी वाटू लागली.हे सगळे चालू असतान खिशात पैसे कमी असायचे त्यामुळे आपोआपच व्यसनावर कंट्रोल होता. पुढे कामाला लागल्यावर हे व्यसन पुन्हा चालू झाले ,घरच्यांना कळु नये म्हणून हॉल्स चघळत घरी जाणे हा प्रकार मी करायचो.घरी असताना तल्लफ आल्यावर माझी हालत पतली व्हायची ,आई वडीलांसमोर सिगरेट ओढने म्हणजे महापाप ,आपला मुलगा वाया गेला याचे त्यांना वाईट वाटूनये म्हणून मी माझी