पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २
याआधीच्या भागात आपण कादंबरीची पार्श्वभूमी व इतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली. भाग २ मध्ये कादंबरीचे सविस्तर कथानक व तिचा परिचय तुम्हाला करून देणार आहे.
भाग १ इथे वाचा: https://misalpav.com/node/52058
कथानक:
शाळेत असताना जाई शेखरच्या आयुष्यात वहिनी म्हणून येते. दोघांच्या वयात जेमतेम तीन साडेतीन वर्षांचे अंतर. शेखरच्या घरासमोर अगदी हाकेच्या अंतरावर तिचं घर. परिस्थितीमुळे लहान वयातच वयापेक्षा जास्त समजूतदार बनलेली, नको असलेल्या नात्यांच्या बंधनात अडकलेली आणि ती तोडू पाहणारी पण अयशस्वी अशी एक स्त्री..
मिसळपाव