लेखकअनन्त्_यात्रीयांनी रविवार, 16/04/2017 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही युद्धग्रस्त देशात घडणारी एक नेहमीची घटना. एक सैनिक लढता लढता धारातीर्थी पडतो. अंत्यविधीसाठी त्याचे शव त्याच्या घरी आणतात. सुन्न झालेले त्याचे कुटुंबीय व सुहृद मृत्यूचे दु:ख अन भविष्याची चिंता यात दुभंगून गेलेले असतात. वातावरणात एक अस्वस्थ करणारी , हृदय पिळवटणारी शांतता……..काळ जणू गोठलाय. पण त्याचवेळी कठोर वास्तव आपल्या निर्मम अस्तित्वाची जाणीव करतंय...
सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी या अटळ परिस्थितीवर कविता लिहिली त्यावेळी ब्रिटनचा राजकवी असलेल्या कवि आल्फ्रेड टेनिसन याने.
-डॉ. सुधीर रा. देवरे
पुस्तकांसाठी (1993 ला) ओसरीच्या एका भिंतीला प्लायवूडचे शेल्फ तयार करून घेतले होते. मी जी पुस्तके विकत घेतो आणि वर्गणी भरून जी नियतकालिके मागवतो ती या शोकेसमध्ये ठेवत होतो. हया पुस्तकांमध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं होती की ते आता विकत घ्यायचं ठरवलं तरी मिळणार नाहीत. संदर्भासाठी जे पुस्तक लागतं ते काढून काम झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यायचं असा परिपाठ. पुस्तक केव्हाही लागतं म्हणून चाळवाचाळव नेहमी होत होतीच.
असंच एका दिवशी मला कुठलंतरी पुस्तक हवं होतं म्हणून काढायला गेलो तर एका पुस्तकाला उधई लागलेली दिसली.