जीवाशी खेळ
कथा आणि व्यथा
. . . . . . . जीवाशी खेळ
पहाटं पहाटं नगर गाठलं.जिपडं हास्पीटलच्या दारातचं उभं केलं. शिव्या खाली उतरला .मागं गेला .पल्लीला उचल्लं.तशी ती मोठयांन विव्हळली. तो तिला घेऊन पाय-यावर आला.तिथचं टेकवली .टेकल्याबरूबर ती लगेच कलांडली.तिचा पार आकडा झाला होता.पारचं गळाटून गेली होती.त्याची सासू सारं बोचक घेऊन माग आली. पल्लीच्या त्वांडावर हात फिरवला .तशी पल्ली विव्हाळली,"आयो मेले गं..!!"
ड्रायव्हर विलाश्यानं पुढी काढली.ते काय करील दुसऱ...? तसचं धाबाड उचाकलं नि त्यात सोडली अन् पायरीवर टेकला . बसलं पचापचा थुकतं.
कचाकचा पाय-यावर चढून तो पार वर आला दुस-या मजल्यावर आला.
मिसळपाव