शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स
दिवस पहिला
इतरांपेक्षा काहीतरी वेगळे शिकावे म्हणून १९७० च्या सुमारास वास्तुविद्येच्या अभ्यासक्रमास गेलो पण दोन वर्षे झाल्यावर तो अभ्यासक्रम सोडला. पण History of Architecture हा विषय शिकताना भारतातील मंदिरे व युरोपातील चर्चेस हा कुतुहलाचा विषय बनलेला होता. पैकी त्यात अभ्यासास असलेली भारत देशातील सर्व प्रमुख मोठी मंदिरे पाहून झाली. " आपल्याला देवात रस नाही पण देवळात जरूर आहे" अशी उदघोषणा करीतच भुवनेश्वर, रामेश्वर, मदुराई, हंपी, बदामी, पट्टडकल, सोमनाथपूर ,तंजाउर, श्रीनगर , ग्वालियर येथील मंदीराना भेटी दिल्या अगदी सहकुटुम्ब. आता साठी ओलांडून गेली.
मिसळपाव
माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.
शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं.