Skip to main content

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 19/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 19/05/2017 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग 'अनुक्रमणिका' वापरून वाचता येतील आधीचा भाग : http://www.misalpav.com/node/39406 सात सालको क्रांती - राणा राजवटीचा अंत आणि नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग! १९४७ साली भारतातून ब्रिटिश निघून गेले आणि नेपाळमध्ये ब्रिटीश समर्थक राणा शासनाचे पारडे काहीसे हलके झाले. पण त्याही आधी, म्हणजे चाळीशीच्या दशकात नेपाळमध्ये एक रंजक बदल घडत होता, हळू हळू पण निश्चित असा बदल.

मँगो पुडींग

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 19/05/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
aamba साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश!

बर्गर आणि वडापाव.

लेखक सचिन काळे यांनी शुक्रवार, 19/05/2017 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला." तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!" ती : "अरेरे! लक्ष कुठे असतं कोण जाणे त्यांच्या आयांचं? हो सरक त्या बाजूला.

"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

लेखक जीएस यांनी गुरुवार, 18/05/2017 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल. सुरुवातीला पाच हजार एकर जमीन व पाच हजार वनवासी परिवार असा एक पथदर्शी प्रकल्प राबवता येईल अशी कल्पना होती. कुठल्यातरी राज्य सरकारच्या मदतीनेच हे होणे शक्य होते. मला श्री.

आगरी विवाहसोहळ्यातील पारंपरिक वडे

लेखक जागु यांनी गुरुवार, 18/05/2017 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
आगरी जमातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो.

कोणता कोर्स निवडावा?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 18/05/2017 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिना येतोय.अॅडमिशनचा महिना.माझ्या एक मित्राला जो १२ वी झालाय,त्याला कोर्स निवडण्यासाठी थोडी मदत करा. इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंशी त्याची खटपट चालू असते.कधी दुरुस्त होतात तर कधी ज्ञान कमी पडतं.घरची परिस्थिती तशी बेताची असल्यानं एखादा अल्पमुदतीचा(३/६ महिने)तांत्रिक कोर्स करुन अर्थार्जन करण्याचं ठरवलंय. थोडी शोधाशोध करुन तीन कोर्स निवडले आहेत. १ होम वायरींग २ मोटर आर्मेचर वायंडींग ३ नेटवर्कींग(CCNA) यापैकी कोणत्या कोर्सला चांगली मागणी आहे?नोकरी कुठे उपलब्ध होऊ शकते? ज्याला सखोल ज्ञान आहे.त्या व्यक्तीला मागणी असणार हे उघडच आहे,तरीही बाजारभाव हा सुध्दा बघितलाच पाहिजे.घेत

रीमा लागूू . . . . भावपूर्ण श्रध्दांजली !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 18/05/2017 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रीमा लागू यांचे हृदयविकाराने निधन . . . . अनपेक्षित . . अचानक . . . या बातमीनं त्यांच्या एक से बढकर एक भूमिका डोळ्यासमोर येत आहेत . . . . नाटक ,चित्रपट, टेलिव्हिजन या सगळ्या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडणारी अष्टपैलू अभिनेत्री आता आपल्याला परत दिसणार नाही याचं मनापासून वाईट वाटतं आहे . . . . विनोदी ,गंभीर, कारुण्यपूर्ण अशा कुठल्याही भूमिकेसाठी ती नेहमीच योग्य होती . . . . नावातच "मा"असल्याने आईची भूमिका तिने यथायोग्य वठवली . . . . . "माझं घर माझा संसार" मधली तिची वास्तवाजवळ जाणारी भूमिका दुसऱ्या कुणालाही शोभून दिसली नसती . . .

इमान...भाग ५

लेखक चिनार यांनी गुरुवार, 18/05/2017 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या चार भागांची लिंक http://www.misalpav.com/node/39750 http://www.misalpav.com/node/39761 http://www.misalpav.com/node/39789 http://www.misalpav.com/node/39798 गब्ब्यानं पाच-दहा मिनिट टाईमपास केला. आतमध्ये जाची त्याची काही हिम्मत होयेना. त्याची बायको म्हनली, "आव चाला की आतमंदी" "हाव..जाऊ ना" गब्ब्यानं तिकीट अन आधार कार्ड शोधाले बॅग उघडली. पाच मिनिट झामल झूमल केल्यावर त्याले पाकीट सापडलं.

पुरणपोळी

लेखक सविता००१ यांनी गुरुवार, 18/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
. प्रत्येक घरात बनवल्या जाणार्‍या खास पदार्थांची एक खास अशी कृती असते आणि तो पदार्थ तसाच बनला तरच तो घरच्या सगळ्यांना आवडतो. माझं घरही याला अपवाद नाहीच. आता पुरणपोळी हा काही मुद्दाम लिहिण्याचा प्रकार नव्हे. कारण प्रत्येक घरी ती बनतच असते. त्यामुळे इथून तिथून सर्वसाधारण सारखीच पाककृती असणार. तरीही विकत मिळतात तशा अगदी पातळ पुरणपोळ्या आमच्या घरात कुणालाच आवडत नाहीत. पोटात पुरण अगदी ठासून भरलेली आणि साजूक तुपासाठी अजिबात हात आखडता न घेतलेली ही पुरणपोळी माझ्याकडे बनते. तीच कृती तुमच्याकरता मी इथे देतेय.