Skip to main content

नटनागर कृष्ण

लेखक शरद यांनी शनिवार, 03/06/2017 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नटनागर कृष्ण भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही.

सायकल प्रवास - पुणे ते पोखले (वारणानगर, कोल्हापूर )- एक स्वप्नपूर्ती

लेखक अजित पाटील यांनी शनिवार, 03/06/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. गेली २ वर्ष झाली सायकलचे थोडे वेड लागले आणि सायकल प्रवास सुरु झाला. अभियांत्रीकी पर्यंत पूर्ण शिक्षण सायकल ने केले नंतर १४ वर्ष नोकरीच्या मागे धावायला लागलो. त्यामुळे ७० किलोचा मी ८८ किलोचा कधी झालो कळालेच नाही. सर्व डाएट प्लॅन करून झाले पण ते फक्त काही दिवसांपुरतेच आणि नंतर ये रे माझा मागल्या प्रकार चालू व्हायचा आणि वजनाची गाडी पुढे पुढेच धावायची. दोन वर्षांपूर्वी माझे मित्र गजानन खैरे यांनी मला सायकलींग बद्दल सांगितले. तो दररोज आपले सायकलींग बद्दलचे फिटनेस अॅप चे फोटो व्हाट्सपवर पाठवत होता.

डावचीच्चाक.. अर्थात कच्चा चिवडा..

लेखक सानझरी यांनी शुक्रवार, 02/06/2017 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी .. हा पदार्थ संध्याकाळी 'काहीतरी खावंसं वाटतंय पण काय ते कळत नै' अशा वेळेला करायचा. आमच्या घरी 5-6 च्या दरम्यान नुसती आई म्हणून हाक मारली तरी मातोश्री विचारतात.. 'हं, मग काय करून देऊ?' 'ते नै माहीत. पण दे काहीतरी करून.' इति आम्ही.. आणि मग कच्च्या चिवड्याचा बेत ठरतो.. सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची.

अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १

लेखक प्रीत-मोहर यांनी शुक्रवार, 02/06/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय.

किस्सा-ए-कोकण रेल्वे

लेखक रघुनाथ.केरकर यांनी शुक्रवार, 02/06/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मँगलोर एक्स्प्रेस ने मी ठाण्याहुन कणकवली ला निघालो होतो. आयत्या वेळी बेत ठरल्या मुळे, रेइजर्वेशन कन्फ़र्म होणे शक्य नव्हते, म्हणुन टाईम्स ऑफ़ वींडीया घेत्ल आणि. निघलो. S ३ च्या दारत शिरलो. टीसी महाशयांना सीट साठी हटकल तर साहेबनि असा काय लूक दीला कि त्यांच्याशी सोयरिकच करायला मागत होतो. मग सोबत घेतलेल टाईम्स ऑफ़ वींडीया दारा कडे अंथरला आणि बैठक जमवली. गाडी १०.३० च्या सुमारास ठाण्याहुन सुटली, दोन तीन प्रवासी सामान घेउन धावाधाव करत होते. गाडी पारसीक बोगद्याच्या बाहेर पडल्यावर माझ्या शेजरी अजुन एक जण पेपर टाकुन बसला.

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ५

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 02/06/2017 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस पाचवा ... "पहाटे जर का मोबाईलच्या गजराने दोघांनाही जाग आली नाही तर परत फियास्को" हे स्वतः च्या मनाला व आमच्या मुलींच्या ममाला दोघानाही बजावले. आमची तिकिटे " नो चेंज -नो कॅन्सलेशन" अशी होती. आम्हाला फ्लॅरेन्सला नेणारी गाडी रोमवरून सुटणारी नव्हती. ही शामभट्टाची गाडी नेपल्स वरून येऊन मिलान ला जाणारी नाईट (नोट्टे) ट्रेन होती. पहाटे पाचला उठून मेट्रो स्टेशन गाठले.रोमची मेट्रो सेवा सकाळी ०५३० वाजता सुरू होते. पहिलीच ट्रेन मिळाली.

अनवट किल्ले १०: गगनगिरी महाराजांचा गगनगड ( Gagangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/06/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तपस्येच्या काळात संसारीक अडचणी नकोत व साधनेत कुणाचा व्यत्यय नको यासाठी बर्‍याच संतानी गिरीशिखरांचा किंवा कुहरांचा आश्रय घेतलेला दिसतो. योगी चांगदेवानी हरिश्चंद्रगडावर तप केले, एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते, गोरखनाथांनी गोरखगडावर तप केले असे मानले जाते, तुकारामांनी भंडारा डोंगरावर तप केले, तर रामदासांच्या निरनिराळ्या घळी प्रसिध्द आहेतच, पण त्यांनी समाधीही सज्जनगडावर घेतली.

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती