Skip to main content

कृष्णाच्या गोष्टी-८

लेखक Bhakti यांनी बुधवार, 24/07/2024 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

**भूत त्याचे ठार काही होत नाही**

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 24/07/2024 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
घोट घे रे यार काही होत नाही जीव जातो फार काही होत नाही. एकदा रक्ताळली बेधुंद झाली. म्यान ही तलवार काही होत नाही. बांधता घर एकदा कळले उन्हाला सावली मग पार काही होत नाही. भूत नसते सिध्द करण्या ठार मेला. भूत त्याचे ठार काही होत नाही. गंजलेल्या जिंदगीला धार देतो आणि मी भंगार काही होत नाही. पोरसवद्या बालिकेची माय होते. स्वस्थ ती घार काही होत नाही. एकदा तिज आपुलेसे मानले कि वेदनेचा भार काही होत नाही. +कानडाऊ योगेशु

पुराच्या पाण्यातला थरार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 23/07/2024 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पुराच्या पाण्यातला थरार ******************* पाऊस जोरात होता. मुसळधार ! संभा तशा पावसात भिजत होता . बरोबर राजा होता. त्याचा दोस्त . त्याचा कुत्रा . असा पाऊस त्यांनी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे दोघेही तो आश्चर्याने पाहत होते . समोरचा परिसर उन्हात नेहमी स्वच्छ दिसायचा . तो आता पावसाने झाकला गेला होता . डोक्यावरून पदर घेतलेल्या गावातल्या बाईसारखा . संभा येळवंडी नदीच्या काठावर रहायचा. म्हशिवली गावाजवळ . त्याच्या जवळपास दुसरी घरं नव्हती .त्याचे वडील मासे धरायचे आणि विकायचे . तो एक लुकडा पण चुणचुणीत मुलगा होता . आणि राजा ?

परबची अजब कहाणी---४

लेखक भागो यांनी मंगळवार, 23/07/2024 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) (भाग—३ https://www.misalpav.com/node/52365) फनजॉब बँकेच्या खारमहाल शाखेत मी कार्जाच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे हा गजानन सदावर्ते नावाचा मच्छर मॅनेजर होता. “साहेब, मला पैशाची गरज आहे, लोन पाहिजे आहे.” मी त्याला विनम्रपाने सांगितले. माझ्याकडे लक्ष न देता तो फायलीत डोकं खुपसून बसला होता. “लोन माझ्याकडून पाहिजे आहे कि बँकेकडून?

Alien Contact

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 21/07/2024 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे.

परबची अजब कहाणी---३

लेखक भागो यांनी रविवार, 21/07/2024 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354) ( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356) “हे पहा – काय तुमचे नाव बरं- परब नाही का, हा तर परब, मी औषधं लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची. चुकवायची नाहीत. काळजी घ्या.” औषधाचे नाव होते अरीस्ताडा(Aristada). “घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा.” त्यानंतर इन्स्पेक्टरची आणि डॉक्टरांची माझ्या अपरोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरने माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली.

वडोदरा,पावगढ आणी चंपानेर-२

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 21/07/2024 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
vd1 काळ्या डोक्याची शराटी वडोदरा,पावगढ आणी चंपानेर--१ https://www.misalpav.com/node/52359 झोपेचं खोबरे होणे हा वाक्प्रचार लहानपणा पासून ऐकतोय पण ते होते कसे हे काहीअजून समजले नाही. जर समजा खोबरे झालेच तर ते चटणी,मोदक इत्यादी पदार्थात वापरता येते का? ...वाचकांना हा एक फालतु जोक वाटेल, मलाही तसेच वाटते.

नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग ४ (काठमांडू)

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 21/07/2024 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग: "सर्व प्रवाशांचे बोर्डिंग झाल्यावर तीन वाजता म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने विमान काठमांडूच्या दिशेने झेपावले..."

विमानातून घडलेले काठमांडू शहराचे विहंगम दर्शन ▼

डोन्ट टच द मनी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी रविवार, 21/07/2024 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. समाधीच्या आधी तुम्ही तुमच्या प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामे करत असता , समाधी साधल्यानंतर तुम्ही प्रापंचिक जीवनातील दैनंदिन कामेच करत असता ! __________________________ बाबा म्हणाले - डोन्ट टच द मनी . डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - पण महाराज , पैशाशिवाय माझे दैनंदिन व्यवहार कसे होणार , माझी पुस्तके , माझा प्रवास , माझें जेवण , खाणेपिणे , ? बाबा म्हणाले - हां तेवढ्यापुरतं ठीक आहे , पण त्या व्यतिरिक्त, डोन्ट टच द मनी. मी म्हणालो - ठीक आहे , प्रयत्न करतो . :) __________________________ संध्याकाळाची वेळ .

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस दुसरा- मुन्नार स्थानिक स्थलदर्शन

लेखक श्वेता२४ यांनी शनिवार, 20/07/2024 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग 1)पूर्वतयारी

2)केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला

     आज सहलीचा दुसरा दिवस होता. सकाळी लवकरच उठून आवरल्यानंतर समोर असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा मध्ये आम्ही नाश्ता करायला गेलो. नेहमीप्रमाणे साउथ इंडियन नाश्ता आम्ही ऑर्डर केला. इडली, मेदुवडा, डोसा अशा पदार्थांवर आम्ही आडवा हात मारला. त्याचबरोबर कॉफी ऑर्डर केली. सगळ्याची चव अतिशय उत्तम होती.