Skip to main content

सूर्याच्या उष्णतेने तापलेली धरणी वारुणराजाला विनवणी करते

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 15/09/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे गगनराजा , थांबव तव उष्ण किरण शरा तव ऊर्जेने मज दाह होतो विनविते तुजला आज धरा उष्ण वात वाहती भवती तप्त ऊन पडे निष्पर्ण त्या वृक्ष लताना पाहुनी धरणी रडे शुष्क होती नद्या जलाशय तडफडती त्यात जलचरे एकमात्र ह्या थेंबासाठी शांत विहग चहूकडे विचरे वासरमणी, तुझिया योगे जलचक्र फिरते ज्ञात आहे मला परी तल्खली होई जीवाची कशी समजावू मी तुला? तव अनलशरे तनूसी भेगा आता किती मी साहू? हे दिनमणी न कळे मजला तुजवीण कोणा मी पाहू? करद्वय जोडुनी नमिते तुजला थांबव हे तप्त आप वरुणराजा बरसआता शमवि मम शरीर ताप ---- शब्दांकित वैभव दातार

पावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 15/09/2017 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्‍यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे "कोराईगड". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय.

पाऊस, भूमी आणि मैथिली

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 15/09/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस, भूमी आणि मैथिली

विस्कळीतपणे मांडले आहे गोड मानून घ्या. ----------------------------------------------------------------------------------------------------------- कधीपासून पावसाची झड लागलीये, *हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार*.. पावसाची झड अजूनही चालूच आहे, थोडी वाढल्यासारखी वाटत्ते आहे का ? असेल कदाचित. हि कातर संध्याकाळ या धो धो पडणार्या पावसाने अजूनच कातर भासत आहे. आतून कुठूनतरी गझलेचा आवाज येत आहे पण पावसाच्या जोराबरोबर तो आवाजही कमी जास्त होतोय...

सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 15/09/2017 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे", ..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार मागच्या वर्षी २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बरेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला. पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे.

फासले ऐसे भी होंगे...

लेखक Naval यांनी गुरुवार, 14/09/2017 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा ग्रॅफोलॉजीचा (हस्ताक्षर व सही याचा अभ्यास ) क्लास चालू होता . सरांनी आम्हाला प्रत्येकाला एक कोरा कागद दिला आणि काहीही मुक्तपणे लिहायला सांगितलं त्यावर आपलं नांव न टाकण्याचीही सूचना दिली . नंतर ते पेपर्स गोळा करून त्यांनी मधूनच कुठलाही पेपर काढून त्याचं अनालिसिस कसं करायच हे समजवायला सुरुवात केली. कागदावरच्या मजकुराचा आकार, मार्जिन आणि मग एक एक अक्षर घेऊन त्या व्यक्तीच व्यक्तिमत्व उलगडू लागले . एक दोन अनालिसिस झाल्यावर त्यांनी माझा कागद सगळ्यांसमोर पकडला ,मनात खूप उत्सुकता होती आज स्वतःबद्दल काय जाणून घ्यायला मिळणार ...

मान गए पंतवैद्य...

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 14/09/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

उदय कॉर्लिग्झम्सचा भाग २

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 14/09/2017 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1( http://www.misalpav.com/node/40857) आपल्या परिवाराला आपण धर्मामुळेच गमवावे लागले अशी भावना मायकलमदधे मुळ धरु लागली होती. त्या दिवशी आपण त्या धर्मस्थळी जायला नको होते हा विचार त्याला पोखरुन टाके. मायकलची अशीच विचारांची तंद्र्ी लागली होती. धर्मस्थळावरच का हल्ला झाला ? कारण त्यांना धर्मावर हल्ला करायचा होता .मुळात धर्मावर हल्ला होतो म्हणजे नक्की काय होत? तर धार्मिक प्रतिकांवर हल्ला होतो. जर ही धार्मिक प्रतिकेच नसतिल तर ? जर असा एक धर्म असेल की ज्याची नक्की परिभाषाच नसेल , धर्मस्थळ नसेल , धर्मग्रंथ नसेल.

गच्ची वरुन...

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 14/09/2017 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे. आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय. --चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ? --भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या --बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर --सगळ्याना द्यायला सोपे जाईल...

उपोषण

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 14/09/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
उपोषण (कविता कालावधी 1996) घुसमटणारी वेदना धुमसणार छत दाबायला जातो मी होत ज्वालामुखीच तोंड ज्वालानदी ही चिरडत वाहते सर्व घर ती वाहुन नेते बसतो मी मग उपोषणास एकटा सदैव एकटा तीन मंत्री घेऊन येतात हातात ग्लास त्यात रस तीन संत्रांचा असतो पण वाटत नाही मी तो नाकारतो कारण त्याच्यावर माझा विश्वासच नसतो येतात तसे जातात तीन मंत्री धूळ चढते गर्दी हटते राहते उजाड स्थळ त्या ठिकाणी दिसते एक निराश खिन्न वीराण शव ते असते माझे सतत पेटणार्याचे राहते तसेच कारण मी उपोषणाला बसलेला असतो

माणसं !

लेखक फिझा यांनी गुरुवार, 14/09/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं ! महाग झालेली पुस्तकं परवडत नाहीत हल्ली पण स्वस्त झालेली माणसं वाचायला मिळतात ! अन सगळीकडे उपलब्ध पण असतात ! कधी कधी पटकन वाचून होतात माणसं कधी समजतच नाहीत, कळतंच नाहीत माणसं ! छोटी माणसं , मोठी माणसं जाड माणसं , बारीक माणसं ! खरी माणसं , खोटी माणसं , सगळ्या साईजची ,सगळ्या विषयांची माणसं ! काही अबोल, अव्यक्त, मनकवडी माणसं काही बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं आपणंच विशेषणे दिलेली माणसं स्वतःला विशेषणे लावून घेतलेली माणसं ! काही आपली , काही परकी माणसं दूर जाऊनही जवळ असलेली माणसं ! खोल खोल मनामधली, मनकवडी माणसं ! विसरलो असं म्हणून आठवणारी माणसं !