'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ?
'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ?
जिल्ह्यात सध्या स्वच्छता मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. हागणदारीमुक्त आणि शौचालययुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रशासन सरसावले असल्याचे दिसत आहे. दररोज सकाळी जिल्हा तथा नगर प्रशासनातर्फे उघड्यावर शौचास जाणाऱ्याला कायद्याचा दंडुका दाखवला जात आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. गावातील लोकांमध्ये शौचालय, स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त व्हावं, लोकांनी स्वच्छेतेकडे आणि चांगल्या आरोग्याकडे विशेष भर द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.
मिसळपाव