Skip to main content

अस्वस्थ न्यायव्यवस्था?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी रविवार, 14/01/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थ न्यायव्यवस्था? विधिमंडळ,कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी राज्यघटनेत अभिप्रेत स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, संसद राजकारण्यांचा राजकीय आखाडा, प्रशासन सत्ताधाऱयांचे बटीक, तर प्रसारमाध्यमांमध्ये आरती ओवाळणारी व्यावसायिकता आल्याचा आरोप आज सर्रासपणे केला जातो. अशा अस्वस्थ वातावरणात न्यायपालिकेची टिकून असलेली विश्वासहर्ता जनसामान्यांसाठी मोठी दिलासादायक आहे. परंतु लोकशाहीचा महतवाचा स्तंभ असलेल्या न्यायदेवतेच्या घरातही अस्वस्थताच असल्याचे चित्र शुक्रवारी संपूर्ण देशाने अनुभवले.

पुणे ते लेह (भाग ८ - गुमरी ते द्रास)

लेखक अभिजीत अवलिया यांनी रविवार, 14/01/2018 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
गुमरी मधून पुढे निघालो आणि अजस्त्र पर्वतांनी स्वागत केले. दूर दूर पर्यंत फक्त आकाशाला स्पर्श करू पाहणारे पर्वत. श्रीनगर लेह महामार्गाच्या सुरक्षेसाठी जागोजागी तैनात असलेले सैनिक आणि रस्ता दुरुस्तीचे काम करणारे कामगार सोडले तर अन्य मानवी अस्तित्व फारसे नाहीच. गुमरी ते द्रास पर्यंतच्या प्रवासात एखादेच छोटेसे गाव लागले असेल. हा तसा अवर्षणग्रस्त प्रदेश असल्यामुळे थोडेफार खुरटे गवत सोडले तर एक झाड दिसायची मारामार. अवर्षणग्रस्त असला तरी ग्लेशिअरचे बर्फ वितळून वाहणारे पाणी भरपूर.

एक 'पोपटी'ची संध्याकाळ

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 14/01/2018 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारीची मस्त थंडी आणि त्यात आम्ही दोन दिवसांकरता का होईना पण अलिबागला गेलो होतो. आम्ही उतरलो होतो तो बंगला तर केवळ अप्रतिमच होता. एक मस्त तरण तलाव होता. मागच्या आवारात भरपूर नारळाची झाडं आणि हिरवं गार गवत. एकदम शांत वातावरण. फक्त पक्षांचे आवाज आणि आमच्या गपा-हसण्याचे. याहून छान आणि निवांत अस काही असूच शकत नाही; अस वाटत होत. दुपारच्या जेवणानंतर मस्त वामकुक्षी आटोपून मुलींबरोबर त्या तरण तलावाकाठी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत बसलो होतो. त्यावेळी बंगल्याचे caretaker विनोदजी आले. त्यांनी विचारले, "या सिझनला पोपटी करतात. तुम्हाला आवडणार असेल तर करतो." म्हंटल,"हे पोपटी काय असत?

पानिपतचे खलनायक - दोन नवीन चित्रे

लेखक मनो यांनी रविवार, 14/01/2018 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र १ शुजा-उद्दोला Shuja-uddola चित्र २ अहमदशाह अब्दाली Ahmadshah पानिपतच्या लढाईला १४ जानेवारी रोजी २५७ वर्षे पूर्ण होतील. या प्रसंगाच्या निमित्ताने पानिपतचा विजेता अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या बाजूने लढलेला शुजाउद्दोला या दोघांची नवीन चित्रे मला एका संग्रहात सापडली. ही चित्रे आणि त्यामागची कथा अत्यंत रोचक अशी आहे.

गतिरोधक एक चिंतनिका

लेखक ss_sameer यांनी रविवार, 14/01/2018 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
गतिरोधकांचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जावा हा अमुचा हट्ट आहे. क्रांतीची फळे ही कायम गोडच असतात असे नव्हे परंतु एखाद्या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटून उठत असेल किंवा क्रांतीज्योतीचे रूपांतर क्रांती वणव्यात होत असेल तर मात्र त्या क्रांतीची गळचेपी करणे साठी प्रतिक्रांती(च) घडावी लागते हा अमुचा(च) अनुभव आहे. भार्येच्या आर्जवपूर्ण (धमकीयुक्त) संदेशास कानाडोळा करून दूरचित्रवाणी वरील चेंडूच्या लाथाळ्या पाहण्यास प्राधान्य देणे ही क्रांतीची ठिणगी आणि ततपश्चात जे घडते ती प्रतिक्रांती. अर्थात हा वरील अनुभव अनेकांनी अनुभवला असेलच.

ग्राम"पंचायत" लागली..!! - 9

लेखक विशुमित यांनी शनिवार, 13/01/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41789 "माउली जय हरी ", विजूबापूनी कोपऱ्याला कोपरा जोडून लांबून नानांना हात जोडले. नानांनी पण ओठांपर्यंत हात उंचावत 'राजनीती' मधल्या मनोज बाजपेयी सारखा प्रति-नमस्कार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि फायनल टच देण्याकरिता विरोधी गटाने कंबर कसली होती. संग्राम गट मात्र कमालीचा सुस्त झालेला दिसत होता. विजूबापू ग्रेट माणूस. विरोधी पक्षातला असला म्हणून काय झाले पण कर्तृत्वान व्यक्तिमत्व . घरातल्या एका खोलीत चालू केलेल्या पतपिढीचा आता वटवृक्ष झाला होता.

प्रीती तुझ्यावरी पण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 13/01/2018 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीती तुझ्यावरी पण,समजे मलाच नाही. या अनाकलनाचा,मी काय अर्थ घ्यावा? शब्दात सांगताना,उरते मनात काही. या गूढ शांततेचा,मी काय अर्थ घ्यावा? एका किनारी तूही ,दुसय्रास स्पर्श माझा. मधल्या प्रवाहितेचा,मी काय अर्थ घ्यावा? मोडून एक काठ,वळते नदी जराशी. मग शांत त्या तळाशी,कोठून सूर द्यावा? जमले मनावरी हे, शेवाळ दाट सारे. गहिरे कसे म्हणू मी?निसटंताचं अर्थ व्हावा! आता मनावरूनी, सोडून देतं सारे. दिसली फुले जरी ही,निरं-माल्य अर्थ व्हावा! सोडून काय देऊ? सारेच क्षणभराचे. हे रोजचेच आहे, साधाच अर्थ घ्यावा. थांबवू कशास मग मी?
काव्यरस

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ३ - ब्रान्तेइ स्रेइ मन्दिरातील शिल्पे.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शनिवार, 13/01/2018 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ३ - ब्रान्तेइ स्रेइ मन्दिरातील शिल्पे. भाग १ भाग २ ह्या भागामध्ये ’बान्तेइ स्रेइ’ (Banteay Srei) ह्या मन्दिरातील शिल्पे पाहू.

अंगकोर वाटच्या आग्नेय दिशेकडे सुमारे २६ किमी दूर असलेले हे मन्दिर त्यातील हिंदु देवदेवता आणि त्यांच्या कथा सांगणार्‍या कोरीव शिल्पांसाठी प्रवाशांचे एक मोठे आकर्षण आहे. कोरीव कामाला अत्यंत उपयुक्त अशा तांबड्या दगडातून ते बांधलेले असून त्या दगडाचा पुरेपूर उपयोग शिल्पांच्या निर्मितीसाठी केला गेल्याचे जाणवते.

लिव इन आणि समाजाची मानसिकता 

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 12/01/2018 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
"अग ते माझ्या शेजारच्या flatमध्ये राहायला आलेलं जोडपं आहे ना त्याचं लग्न नाही झालेलं." "काय सांगतेस काय? तुला बऱ्या असल्या बातम्या मिळतात." "अग, काल मी घरी येत असताना ती भेटली जिन्यात. तर विचारल तुझा नवरा काय करतो? म्हणाली तो माझा नवरा नाही काही. आम्ही अजून लग्न नाही केलेलं असंच राहातो. कमाल आहे न? काय बोलणार यावर? मी आपली गपचूप घरात शिरले माझ्या." 'काय सांगतेस? स्पष्ट सांगितलं तिने?" दोन मैत्रिणी बागेत आपापल्या मुलांना खेळायला सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. मी नेमकी त्यांच्या बाजूच्याच बाकावर बसले होते त्यामुळे त्यांचा संवाद एकू आला आणि मनात विचार आला..

ओटीतले ब्लाऊजपीस...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 12/01/2018 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
- काकी, पुन्हा सुरू झाले बघ.. - आता काय... थांब बघते.. अरे देवा… तिकडे सुखी कुटुंब च्या ग्रुपवर पुन्हा एकदा मेसेज आला होता.. आशय काहीसा असा.. कोकणात हाणामारी, मोर्चे हे प्रकार फार होत नाहीत, कारण, लिंबू पुरतं.. आता यावर हसावं की रडावं.. तर विनोद म्हणून हसावं. पण किती वेळा? एकच विनोद तीन माणसांनी सलग तिनदा टाकला की हसू येण्याऐवजी संतापच येतो हल्ली. मग मला पर्सनलवर मेसेज करणाऱ्या पुतण्याने सुखी कुटुंब वर मेसेज टाकला.. “संक्रांत येतेय. तिळगुळाचे मेसेज सुरू करायचे का...” मी त्याला प्रतिसाद दिला, थांब जरा.