Skip to main content

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

शनिवार, 17/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.

कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ

लेखक kool.amol
शुक्रवार, 16/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात.

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

गुरुवार, 15/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

गुरुवार, 15/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

सायकलवाली

गुरुवार, 15/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलवाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर . एक सायकल मजेत चाललेली . लेडीज सायकल . ती वाडिया कॉलेजहून निघाली होती , ती कॅपिटल टॉकीजला . कॅम्पमध्ये . तिथे बॉबी लागलेला . ऋषी आणि डिम्पल ... म्हणजे काय ? खलासच ! त्यावेळचा सुपर डुपर हिट पिक्चर ! तरुण पोरापोरींच्या त्यावर उड्या पडत होत्या . यात नवल ते काय ? लेडीज सायकल म्हणजे - चालवणारी अर्थातच मुलगी होती . गोड अन अवखळ . पांढऱ्या रंगाचा चिकनचा कुर्ता घातलेली . पण - तिच्या मागे कॅरियरवर अजून कोणी होतं . अन ती कोणी एखादी मुलगी नव्हती ; तर तो तिच्या वर्गातला एक मुलगा होता . पण नुसता मुलगा नाही ...

BIV:Thought Experiment

लेखक भागो
बुधवार, 14/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
BIV:Thought Experiment गेल्या तीन महिन्यापासून मला चिडचिडल्या सारखे होतंय. विस्मरण वाढलय. मधेच पंधरा वीस मिनिटं ह्या जगात आपण नाहीहोत असं वाटतं. बायको म्हणते कि डॉक्टरला का भेटत नाही? ब्लड प्रेशर चेक करून घे एकदा. माझ्या वाहिनीच्या भावालाही असाच त्रास होत होता. इत्यादी. एकदा ऑफिसमध्ये माझा डावा हात गायब झाला. गायब झाला म्हणजे असं मला वाटत होते. पॅनिक अटॅक. “हलो, अनंत, मी परब. आठवतंय?” लोक धावपळ करत होते. त्यांची दबलेल्या आवाजातली कुजबुज. मग उजव्या हाताने चाचपडत डावा हात शोधून काढला आणि घट्ट पकडून ठेवला. त्या पाच मिनिटात दरदरून घाम सुटला.