नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
नवीन भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे. मार्गदर्शन करावे.
दैनंदिन घरगुती वापरासाठी भ्रमण-संगणक (लॅपटॉप) घ्यावयाचा आहे.
बजेट : ३००००-४००००.
मनाचं प्लॉटिंग
माझ्या मनात आहेत असंख्य Non Attached प्लॉटस
गुंतत नाही मी सहसा कशात
प्लॉटिंग करून ठेवलंय मी
काटेरी तारेच्या कुंपणाने बंदीस्त
लहान होतो तेव्हाही होतेच हे प्लॉट
पण त्याला असायच काटेरी ठेवाच कुंपण
त्यावर काटे असले तरी फुलही फुलायची अधूनमधून
आता मात्र मनाचे प्लॉट
रुक्ष व्यवहारांच्या काटेरी तारेने वेढलेले
हल्ली कुंपणावर वाढवलेला वेल
दिसायला सुंदर दिसतो
मात्र त्याखालीअसतेच व्यवहारांचा पहारा
कुणाशीही मोकळंढाकळ बोलावं
असं नाही राहिलं अंगण
प्रशस्त गेटमधून कुणी आलं बोलायला
तरच बोलावं हेच झालंय आमचं हाय स्टॅंडर्ड
वलय (कादंबरी) - प्रकरण ५
प्रकरण ४ ची लिंक: http://www.misalpav.com/node/41834
----
प्रकरण 5
थोड्या वेळानंतर रागिणीने बेडवर अंग टाकले. कपाळावर हात ठेवून ती छताकडे बघत बसली.
स्क्रिप्ट वाचता वाचता बराच वेळ निघून गेला पण आता तिला पुन्हा तो फोन कॉल आठवू लागला. झोपण्याचा प्रयत्न केला तरी झोप काही केल्या येत नव्हती. डोळ्यात गुंगी साठत होती होती पण अनेकविध विचारांनी झोप येत नव्हती...
... तिचे कान काचांच्या फुटण्याच्या आवाजाने भरून गेले.
रोहनचा भीषण अपघात तिला आठवला...
तिचे जीवनातले पहिले प्रेम - रोहन राठी!
गीताई माऊली माझी...
आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.
भित्यापाठी.......आणखीन भिती......
भित्यापाठी ...आणखीन भिती....
पोटभर खायला मिळाले कि किती समाधान असते हे भिक्याला आज बरेच दिवसांनी अनुभवाला आले. भिक्याला आज सगळे जग एकदम सुंदर आणि प्रसन्न वाटायला लागले.
आज थोड्या वेळापूर्वीच एका उकिरड्यावर त्याला एक प्लास्टिकचा डबा सापडला होता. त्यात कुणीतरी चार पाच इडल्या टाकून दिल्या होत्या....थोडा वास येत होता पण भिक्याला खाता आल्या..त्याचे पोट एकदम भरून गेले.
..... या पोटाची योजना या देवाने काही बरोबर केलेली नाही असे भिक्याला नेहमी वाटायचे.दररोज एकदा तरी , ही पोटाची खळगी भरायला लागते हे काही बरोबर नाही....
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १
फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा - १
संक्रांत..
(प्रेमाचे उत्तरायण..)
आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता.
आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..!
त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते.
एपि फनी श्रद्धा, ऑर्थोडॉक्स पुतीन
पुतीन हे रशियाचे बर्याच वर्षांपासूनचे अध्यक्ष, अजून एकदा अध्यक्षीय निवडणूक रिंगणात आहेत. आमेरीकेत मागच्या वर्षी ओबामा जाऊन ट्रंप सरकार आल्यामुळे आमेरीकन टिका कमी झाली असली तरी युरोमेरीकन माध्यमे अजूनही पुतीन बद्दल टिकात्मक मजकुर छापत असतात.
पुन्हा एकदा अध्यक्षीय निवडणूकीस उत्सूक ६५ वर्षीय व्लादिमीर पुतीन यांनी फूल मिडीया ग्लेअर मध्ये सलमान खान स्टाईल शर्ट काढून ठेवला आणि त्यांच्या रशीयन ऑर्थोडॉक्स श्रद्धेनुसार पवित्र स्नानासाठी -६ डिग्री सेल्सीअस तापमानातील खुल्या तलावात डुबकी मारली.
सर्व द्रव्यांमधला समान धागा कोणता? (What is the similarity between all the nine substances)
राजा कालस्य कारणम्..म्हणजे राजाच्या इच्छेने राज्यात बऱ्याचश्या गोष्टींना चालना मिळते. घरातल्या कर्त्या पिढीच्या मताने घरातल्या गोष्टी घडतात. विक्रमाच्या राज्यातही काही वेगळे घडत नव्हते. पण सृष्टीमध्ये अशाही काही गोष्टी घडतात की जिथे असा कोणी माणूस, कोणी सजीव काही करताना दिसत नाही. जसं लोहचुंबक(magnet) जवळ आल्यावर गुळाला मुंगळे चिकटावे तसा लोहकीस त्याला चिकटतो. थंड पदार्थ व गरम पदार्थ जवळ जवळ ठेवल्यावर थंड पदार्थ काही अंशी गरम होतो व गरम पदार्थ काही अंशी थंड होतो. थंडीत तेलाचा व तुपाचा दिवा लावावा, तर तेलाचा दिवा जळत राहतो पण तुपाच्या दिव्यातले तूप सतत गरम करावे लागते, नाहीतर दिवा शांत होतो.
(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
जर विशालची तरही तर आमची जरही
(जरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला
मोकळे हापिसात् कधिही, व्हायचे नव्हते मला
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला,
कळ उठता पोटातूनी, दाबूनी ठेउ किती?
दर्प जहरी इतरे जनांना, द्यायचे नव्हते मला
आज गडबड जाहली पोटामधे माझ्या कशी?
करपट ढेकर द्यायची, मिटींग मधे नव्हती मला
वेळ नाही काळ नाही, ना कुणाची लाजही,
पाचवी वाटी बासुंदीची , प्यायची नव्हती मला,
पोट भरण्या अर्थ नव्हता, पंगती मधे तुझ्या
खात आलो मी जरीही, खायचे नव्हते मला
पैजारबुवा,
काव्यरस
मिसळपाव