Skip to main content

सागरी भ्रमंती..

लेखक भटकीभिंगरी यांनी शनिवार, 24/02/2018 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
CFU (व्हॉटसअप गृप ) कोस्टल वॉक /ट्रेक , सागरी पदभ्रमण मोहिम -२ ... भाग पहीला ... दिवस पहिला - ०६/०२/१८ ठाणे प्लॅटफॉर्म न. ५ वर १०४५ पासुन सहभागी जमु लागलेत .एकजण मुम्बईहुन बसुन येणारेत . बाकी अंबरनाथ ,कल्याण,डोंबिवली, ठाणे येथुन ..ठाणे येथे बसणार ... एकजण खेडला पहाटे ४किंवा गाडी पोचेल तेव्हा खेड येथे गाडित बसतील ... सर्व सहभागी जमल्यावर रिवाजाप्रमाणे सेल्फि काढुन झाले ..

सनी व बबन्याच्या टेक्निकल गप्पा..

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 23/02/2018 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..या निमित्त एक नवीन लेखन प्रयोग सादर करतोय..बोली भाषेत टेक्निकल चर्चा मांडण्याचा.. सनी व बबन लंगोटिया यार. म्हणजे शाळेतले विटिदांडू व क्रिकेट चे गल्ली क्रिकेट तिथपासून कॉलेज मधले वर्गांऐवजी मैदानावर क्रिकेटियर होण्याची स्वप्ने पाहत घालवलेले तासन्तास, त्यासाठी झालेला कटिंग चहा वरचा खर्च या सर्वातच ते भागीदार होते. तशी त्यांची पाळण्यातली किंवा आधारकार्डावरची नावे साईनाथ उर्फ सनी आणि हर्षवर्धन उर्फ बबन. त्यांची ही नावे कशी पडली ते नंतर कधीतरी बोलु. तर या दोघांमध्ये काही साम्यस्थळे व काही जमीनआस्मानाचे फरक.

देव आहे कि अजून कोण ?

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 23/02/2018 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,, आम्हाला गाव नाही आहे .. आम्ही मुळातच कोयना प्रकल्पग्रस्त असल्याने जी काही मजा केली ती कोकणातच .. मामाच्या गावी ... चिपळूणमध्ये ... चिपळूणमधून वर कुंभार्ली घाट चढला कि घाटमाथा चालू होतो .. तिथून थोडी गावं पार केली कि आमची ग्रामदेवता पद्मावती नव्याने बसली आहे .. तिचे दर्शन तसं म्हंटल तर वर्षातून एकदा तरी घेतो कुटुंबासमवेत ... कधीकधी मनात आलं आणि एकटाच चिपळूणला गेलो असेन तर मामेभावाची बाईक काढून देवीच्या दर्शनाला जाऊन येतो ... कोयना एक निसर्गरम्य ठिकाण .. घनदाट झाडी ... भरपूर प्राणी आणि झुळझुळ वाहणारे अखंड पाणी ... खरंच हेवा वाटावा असं ठिकाण ...

चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक ( Chandragad To Aurtherseat Point )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 23/02/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण, महाबळेश्वर. इथे यायचे आणि महाबळेश्वर पठाराच्या सर्व बाजुच्या टोकाला उभारलेल्या पॉइंटवर जाउन सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा हि एक प्रथाच झाली आहे. या सर्व पाँईटपैकी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो, तो ऑर्थरसीट पाँईटला. मुळात सह्याद्रीची ७०० मीटर उंची आणि त्यावर वसलेले साधारण १३७२ मीटर उंचीचे महाबळेश्वर पठार. हि संपुर्ण उंची अनुभवायची असेल तर एकच सुयोग्य जागा, म्हणजे "ऑर्थरसीट पाँईट". एकाच वेळी रायगड, पुणे आणि सातारा असे तिन्ही जिल्ह्याचा परिसर ईथून पहाता येतो. इथल्या सज्जावर उभारल्यास खाली सावित्री नदीचा उगम आणि एका बाजुला पिटुकला "चंद्रगड" दिसतो.

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १. मराठी भाषेत संस्कृत भाषेतून घेतलेले शेकडो शब्द आणि तशीच वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत गेलेला असतो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी एकूण सहा भागांमधून सदस्यांपुढे ठेवणार आहे. प्रथम शब्द किंवा वचन, नंतर त्याचा स्रोत आणि अखेरीस सरल अर्थ असे ह्या लिखाणाचे स्वरूप आहे. ह्या लेखनाचे एकूण सहा भाग ह्यापूर्वी 'उपक्रम'मध्ये प्रकाशित केले होते आणि तेथे सदस्यांना ते आवडल्याचे दिसले.

शेवटचा उपाय...

लेखक Jayant Naik यांनी शुक्रवार, 23/02/2018 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा उपाय ... मनीषा घोरपडे आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला ,त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला निकम हिचा विवाह ठरला म्हणून उज्वालाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता . मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती.पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता.

वलय (कादंबरी) - प्रकरण १४

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 23/02/2018 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १३ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42022 प्रकरण 14 गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओ मध्ये जिंतेन्द्र करमरकर खूप काळजी अणि चिंता करत बसला होता. त्याचे कशातच मन लागत नव्हते.

भावनांचा मेळ

लेखक प्रणया यांनी शुक्रवार, 23/02/2018 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
जपून खेळायचे असतात शब्दांचे खेळ चुकतो ठोका हृदयाचा जेव्हा त्यात घालताच येत नाही भावनांचा मेळ जर नेहमीच मन हलके शब्दांनीच केले असते अंतरीच्या अबोल भावनांचे अर्थ नयनांच्या भाषेने कोणी सांगितलेच नसते म्हणे रुचतात गोड बोल, सात्विक चेहेरे मनाला सर्वांत आधी पण प्रेम तर त्यावरही करतो ज्याला पहिलेच नाही कधी गमावलेल्या गोष्टी शोधण्यातच आनंदाचे गुपित जर दडलेले असते जे नव्हतेच कधी आपले ते शोधण्यासाठी जीव झुरलेच नसते वाटते सोबत सर्वांना असावी प्रियजनांची नेहमी दुःखच विरहाचे स्वप्नांतही नकोसेच असते जर रोजच चांदण्यांचा साथीने चंद्रप्रकाशाने मनास न्हाऊ घातले असते तर सांगा ना तेव्हा कलेकलेने वाढलेल्या पु

मला भेटलेले रूग्ण - १२

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 22/02/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.