Skip to main content

कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख १

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 15/05/2018 07:26 या दिवशी प्रकाशित केले.

दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो.

दोसतार-९

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/05/2018 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42589 मी आईला हे एकदा सांगितले . ती मला खुळा म्हणाली नाही. माझ्या केसांवरून ,गालावरून हात फिरवला, माझी हनुवटी हातात धरली. आणि तिचे डोळे एकदम रानातल्या तळ्यासारखे पाण्याने भरून आले.काठोकाठ. ढग गडगडायच्या अगोदर मला त्यांना एकदा सांगायचंय. तुम्ही खुशाल गडगडा...पण विजेची टाळी देवून कुणाची आज्जी घेवून जाऊ नका. विजेची टाळी देवून ढग गडगडले की मला वाटते कोणाची तरी मऊसूत कापसाची आज्जी गेली. शाळा सुरू झाल्याझाल्या पहिली गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे.

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

लेखक खिलजि यांनी सोमवार, 14/05/2018 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयलं व्हतं त्ये धरणावाणी त्यात मॉप व्हतं पाणी रंगीत मासळी पवत होती मस्त लव्हाळं झुलंत होती दिवसा खोखो नि रात्री कबड्डी जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी चाबूक घेऊन खाली तू आली काय ठाऊक तू खाऊन आली ? फटक्यात जिंदगी स्मशान केली ती चमचमती दुनिया बी गेली त्या समद्यास्नी मारून टाकलंय मॉप पाणी बी आटवून टाकलंय समद्या भावनांना पेटवून टाकलंय माझं मन बी बोन्साय केलंय पयला होतो म्या ताडावाणी दिस रात एक मज होते मनी तारे लखलखत होते खायचो कोंडा अन प्यायचो पाणी चउत भाकरीने बाजार जो केला आत्ता जन्माचा उरलो अडाणी फगस्

पुनःश्च - किरण भिडे

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 14/05/2018 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, किरण भिडे यांच्या वतीने हा लेख इथे देत आहे. धन्यवाद. ------------------------------ a दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं.

एकाच माळेचे मणी

लेखक जेडी यांनी सोमवार, 14/05/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या.

|| छत्रपती संभाजीराजे यांचे अप्रकाशित दुर्मिळ चित्र ||

लेखक मनो यांनी सोमवार, 14/05/2018 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ मे - इंग्रजी तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (जन्म १४ मे १६५७). यानिमित्त संभाजी महाराजांशी संबंधित माझे संशोधन आज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. बातमीत सगळे बारकावे देणे शक्य नसते, म्हणून हा एक विशेष लेख - बातमीच्या तुलनेत इथे प्रतिक्रियांतून भरपूर शिकायला मिळते, तेंव्हा आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. === छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द हि १६८० ते १६८९ अशी फक्त नऊ वर्षांची होती, पण या थोडक्या कालावधीतच त्यांनी फार मोठा पराक्रम गाजवलेला आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या ह्या पराक्रमी छत्रपतीची अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच चित्रे आजवर उजेडात आली आहेत.

फ्राम म्युझिअम आणि ध्रुवीय मोहिमा

लेखक देतनूशंसाई यांनी सोमवार, 14/05/2018 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो आणि डोंगर दऱ्यांमध्ये येते तशी एकदम अंधारी रात्र झाली. आकाशात एवढे तारे असतात हे माझ्या सारख्या शहरातच राहिलेल्याला पहिल्यांदाच कळलं.

आठवणीतली 'ती'

लेखक गणेश.१० यांनी रविवार, 13/05/2018 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
ती घरी आली तेव्हा पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली होती. मला ती सगळ्यात जास्त जीव लावायची. आणि मीही तिची खूप काळजी घ्यायचो. तिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही. पण आमच्या दोघांच्या मात्र खूप गप्पा रंगायच्या. आम्ही तासन-तास एकत्र खेळायचो. मी क्रिकेट खेळत असताना ती मला खिडकीतून पाहत असायची. मी लिखाण करताना ती एकटक मी काय लिहितोय हे पाहत बसायची. मी तयार केलेल्या खेळणीला फक्त तिला हात लावू द्यायचो. मला घरी यायला उशीर झाला की तिचे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे. माझ्या खाऊतला वाटा मी आधी तिला द्यायचो. मी कॉलेजला गेल्यावर मात्र आमचं भेटणं कमी झालं.

आई...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 13/05/2018 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आई... तब्बल दहा वर्षं या शब्दाचा कल्पनाविस्तार करण्याचा मी प्रयत्न करतोय. हजारो विचारांचे गुच्छ त्यासाठी आनंदाने समोर येऊन हात जोडून उभे राहात होते. आम्हालाही वापर.. म्हणत! पण काय होत होतं माहीत नाही. आपल्याकडे शब्दांचा पुरेसा साठा नाही, असंच सतत वाटत राहायचं. आज, या क्षणालाही तसंच वाटतंय. पण तरीही ठरवलं. डोळे मिटून लिहायचं. जमेल, आठवेल, सुचेल तसं लिहीत जायचं. आणि शब्द संपले, की त्या क्षणी, तिथे थांबायचं. तसंही, यावर लिहिताना, भल्याभल्यांना शब्द सापडत नाहीत.

रेशीममार्गावरील भटकंती : उझ्बेक-ताजिक-अफगाणिस्तान-अझर्बैजान लाईव्ह ब्लॉग

लेखक समर्पक यांनी रविवार, 13/05/2018 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मे २०१८ मधील माझ्या मध्य व पश्चिम आशियातील काही देशातील भटकंतीचा त्या वेळी लाईव्ह प्रकाशित केलेला वृत्तांत