Skip to main content

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 18/06/2018 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

राजयोग - १३

लेखक रातराणी यांनी सोमवार, 18/06/2018 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय. रघुपतीला पाहताच टेहेळणी बुरुजावरचे पहारेकरी सावध झाले. शंख वाजू लागले.

ऑडासिटी कट, पेस्ट, फेड, एक्स्पोर्ट इ. [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग २]

लेखक चहाबिस्कीट यांनी सोमवार, 18/06/2018 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाची पीडीएफ लिंक इथे आहे भाग १ https://www.misalpav.com/node/42802 भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

पहिल्या भागाची लिंक. मागच्या भागात आपण पाहिलं की आपला आवाज रेकॉर्ड कसा करायचा आणि रेकॉर्डिंग ऑडासिटी मध्ये कशी बघायची.

कच्छी दाबेली

लेखक मानसी१ यांनी रविवार, 17/06/2018 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी हवा झाली आणि काही तरी चटपटीत खायची इच्छा झाली. घरी मस्त दाबेली चा बेत केला. साहित्य पाव, मसाला दाणे, बारीक शेव उकडलेले बटाटे। 4-5 चिंच खजूर चटणी पुदिना कोथिंबीर चटणी बारीक चिरलेला कांदा डाळिंब दाणे बटर गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, तीखट, मीठ क्रुती कढईत तूप गरम करून त्यात 3 पळ्या गोड चटणी घाला. त्यात कुचकरलेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा पावभाजी मसाला, 1/2 चमचा चाट मसाला , चवीनुसार मीठ आणि तिखट घाला. सर्व नीट मिसळून घ्या. सारण तयार एक पाव घेऊन मधून चीरा. दोन साइडने. पूर्ण आडवा कापायचा नाही. एका बाजूला गोड चटणी, एका बाजूला तिखट चटणी.

तेज (Discussion on characteristics, properties and classification of fire/energy)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 17/06/2018 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील तेज किंवा अग्रि पदार्थांच गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली तेज-अग्नि-प्रकाश अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो). ४.३: ३८तेजस्त्वाभिसम्बन्धात्तेजः । Fire is that which belongs to the class ‘fire’. तेज या गटात अग्नि इत्यादि सर्व अग्निसमान वस्तूंचा समावेश होतो. रूपस्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथक्त्वसम्योगविभागपरत्वापरत्वद्रवत्वसंस्कारवत् । It is endowed with – colour, temperature, number, unit of measure, separateness, conjunction, disjunction, distance, proximity, fluidity and the ability to apply force. तेजाला रंग, तापमान, संख्या, परिमाण, वेगळेपणा, जोडलेपणा(येउन जुळणे), विभक्तपणा(लांब जाणे), अंतर, जवळीक(सान्निध्यात राहणे), वहनक्षमता आणि बळ लावण्याची क्षमता या सर्व आहेत. ४.३: ३९पूर्ववदेषाम्सिद्धिः । The fact of these properties belonging to the class ‘fire’ is to be shown, as before, to be indicated in the sutras. हे गुणधर्म आधील प्रमाणेच वैशेषिक सूत्रांमध्येही सांगितलेले आहेत.

'छंदामागचं त्रिकूट'

लेखक उपयोजक यांनी रविवार, 17/06/2018 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या बाबतीत एखाद्या गोष्टीचं छंदात किंवा मराठीत ज्याला पॅशन म्हणतात त्यात रुपांतर कधी होतं? जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे उदा.चित्रकला असो किंवा गायन,वादन,लेखन,वस्तूंची निर्मिती,दुरुस्ती,विक्रीकला कोणतंही क्षेत्र असो, त्यातून स्वत:ला आनंद तर मिळायला हवाच पण लोकांकडूनही कौतुक व्हायला हवं तरच ती कला,तो छंद अजून बहरतो.त्या छंदातलं अजून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा हुरुप वाढतो.हा हुरुप वाढवण्याचं काम लोक करत असतात.त्यांच्यामुळेच तर कळतं की आपण सामान्यापेक्षा थोडेसे का होईना वरचढ आहोत.ही 'थोडसं वरचढ' असण्याची भावनाच सुरुवातीच्या प्रेरणेचं काम करत असते.त्या प्रेरणेच्या जोरावरच आपण अज

macOS आणि iOS-6 (Batch resize photos)

लेखक शाली यांनी रविवार, 17/06/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखात आज अजुन एक Automator Workflow पाहूयात. आपल्याला बऱ्याचदा सोशल साईटवर इमेज अपलोड कराव्या लागतात. उदाहरणार्थ आपल्या 'मिपा’वर फोटो टाकायचे असतील तर अगोदर दुसऱ्या एखाद्या साईटवर अपलोड करुन येथे त्या ईमेजची लिंक द्यावी लागते. अर्थात लिंक बॉक्समध्ये मिपा तुम्हाला साईज विचारते. (मिपा सदस्यांसाठी फोटो टाकणे ही बरीच मोठी समस्या आहे.) पण ईतर साईटस् वर आपल्याला ईमेज resize करावी लागते. पण जेंव्हा एकापेक्षा जास्त ईमेज अपलोड करायच्या असतात तेंव्हा प्रत्येक ईमेज रिसाइज करणे जरा त्रासदायक ठरते. त्यासाठी आज आपण Automator वापरुन एक अॅप तयार करु.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 16/06/2018 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

macOS आणि iOS-5 (AirDrop)

लेखक शाली यांनी शनिवार, 16/06/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
फाईल्स शेअर करण्यासाठी प्रत्येकवेळेस Finder मध्ये जाऊन file sharing feature ऊघडायचे किंवा ⌘+space वापरुन Spotlight search मधून AirDrop लाँच करणे या द्राविडी प्राणायामापेक्षा जर AirDrop तुमच्या डॉकवरच असेल तर? जशी तुम्हाला वारंवार लागणारी ॲप्स तुम्ही डॉकवर place करता तसे? तर या लेखात आपण AirDrop डॉकवर कसे place करायचे ते पाहू. AirDrop डॉकवर place करायचे म्हणजे खरं तर AirDrop feature चा शॉर्टकट place करायचा. पण हे feature नेहमी system folder मध्ये असते आणि तेही by default हिडन. म्हणजे सहज शोधायचे म्हटले तर दिसणार नाही. macOS महत्वाचे फोल्डर हिडन ठेऊन एकप्रकारे काळजीच घेत असते.

PDF फाईल्सबद्दल....

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 16/06/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्‍या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत.