Skip to main content

पु.ल.

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 26/06/2018 10:50 या दिवशी प्रकाशित केले.

पु.ल.

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 26/06/2018 10:48 या दिवशी प्रकाशित केले.

पु.ल.

लेखक सई जोशी यांनी मंगळवार, 26/06/2018 10:47 या दिवशी प्रकाशित केले.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ४

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 25/06/2018 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

.....कार्यकर्ता.....

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
गरीबांचा बुलंद आवाज..... साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा......... नाद नाय करायचा वाघाचा... येऊन येऊन येणार कोण??" घोषणांनी सत्तुचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच- सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता.... पक्षाचं काम करताना सत्तूचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही..... मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण.

पॉझीटीव्ह

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 25/06/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या

हजारो बेटांचा देश...... फिनलँड.... भाग १

लेखक बरखा यांनी सोमवार, 25/06/2018 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी सुरुवातीपासून सांगायचे झाले, तर नवरा कामानिमित्त फिनलँड येथे गेला आणि मग आमचे, म्हणजे माझे आणि मुलाचे तिकडे जाण्याचे ठरले. तयारी सुरु झाली. नवर्‍याची कंपनी जरी सगळ करणार होती तरी एवढा लांबचा प्रवास एकटीने करण्याचे धाडस मलाच करायचे होते. आता तुम्ही म्हणाल त्यात एवढ काय? पण माझ्या बाबतीत खरी गंमत ही की माझा आणि ईंग्रजी भाषेचा शाळेत असल्यापासून छत्तीसचा आकडा आहे तो अजूनही आहे. त्यात पुण्याच्या डेक्कन परिसराहून अधिक लांब कुठेच एकटी फिरले न्हवते. त्यामुळे माझ्या समोर पहिला प्रश्न होता तो एकटीने प्रवास करण्याचा आणि व्हिसा ऑफिस मधे समोरच्या माणसा बरोबर मी काय आणि कसे बोलणार याचा.

वाळवीची पावसाळी रात्र.

लेखक गवि यांनी सोमवार, 25/06/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ पुष्कळ झाली तसे वाळवीने आपले थकलेले दोन्ही डोळे तळव्यांनी दाबले. कार्यालयातले सर्व सहकामी कधीच निघून गेले होते. वाळवीने तिच्या मांडीमाथ्याच्या पडद्याकडे एक शेवटची नजर टाकली. काही नवीन ईडाक वरिष्ठांकडून आलेली नव्हती. क्षेत्रीय कार्यालये आणि केंद्रीय कार्यालय यांच्यातल्या संपर्कांबाबत वाळवीचं काम नेहमीच मरणरेषेवर चालत असे. उदेका किंचित जरी जास्त झाला तरी साप्ताहिक पुनरावलोकनात त्याचा उल्लेख होत असे. तिच्या कुंजी परिणाम क्षेत्रात हा उदेका मुख्य होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. स्थानिकेने आमटीपथ ते श्रीस्थानकापर्यंत जाताना मांडीमाथाथैली भिजली असती.

साखळी Break the chain

लेखक aanandinee यांनी सोमवार, 25/06/2018 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी माझा मूड अगदी छान होता. काही विशेष कारण होतं असं नाही पण कधी कधी उगीचच छान वाटत असतं ना, तसा. आणि मग अचानक कुणाशीतरी बोलताना त्यांनी काहीतरी शेरा मारला, दुखावणारा, अगदीच अनावश्यक, झालं .... माझ्या छान मूडच्या फुग्याची सारी हवा गेली. त्यानंतर कामानिमित्त (professionally) मी ज्या कोणाला भेटले त्यांच्याबरोबर मी वेळ मारून नेली. पण घरी आल्यावर मात्र माझ्या मुलाच्या लहानश्या चुकीवर मी उखडले. इतर दिवशी कदाचित त्या लहानश्या गोष्टीवरून मी एवढी ओरडले नसते. मग त्या दिवशी का ओरडले? मी स्वतःशी विचार केला, माझी सबब तयार होती, “मी रागावले कारण दुसर्या कोणीतरी आधीच मला चिडवून ठेवलं होतं.

मिरगाचो पाउस

लेखक Patil 00 यांनी सोमवार, 25/06/2018 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिरगाचो पाऊस -मालवणी कविता मिरगाचो पाऊस इलो चाग्लो वाजत गाजत। विजो कडाडले नी ढगांचो गडगडाटय झालो।।१।। तरी मिया म्हणतंय नायकाचो बाबलो गायब ख्य झालो। वाटच पावसाची बगी होतो तेंनीच माझो कोम्बो पळवलो।।२।। गावात कायव होयना माझ्या कोंबड्यार सगळ्याचो डोळो। फाटकी येव शिरा पडो मेल्यार बोलवोन हाडा लगेचच त्येका।।३।। येवदे त्येका चांगलेच गाळयोे घालतेय। सांगोती नी वडे घराकडे पोचोवक सांगतंय।।४।।