आरक्षण चोरी
आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर".
सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला.
मिसळपाव