बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)
बघता मानस होते दंग ४: मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर (९४ किमी)
९ सप्टेंबरची पहाट. काल रात्री चांगला आराम झाल्यामुळे अगदी फ्रेश वाटतंय. आज रविवार आहे, त्यामुळे किंचित उशीरा निघायचं आहे. पण पहाटे जाग आली, म्हणून लवकर उठून बाहेर चक्कर मारली तर बाहेर सर्व शांतता आहे. चहाचं हॉटेलही बंद आहे. मग आवरून आरामात सातला बाहेर पडलो. आता हॉटेल सुरू झाली आहेत. नाश्ता करताना माझ्या सायकलीला बघून अनेक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर्सनी माझी विचारपूस केली! जवळच मलकापूर बस स्टँड आहे. थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलून पावणे आठला मलकापूरमधून निघालो. गेले चार दिवस काय बघायला मिळालं आहे!
मिसळपाव